जिल्हा परिषद शाळा ते आय. आय. टी हैद्राबाद

212

चंद्रपूर जिल्ह्यातील समीक्षा ठरली पहिली आदर्श

भिसी : परीघावरील विद्यार्थांनी आपली वंचितता दूर करण्यासाठी मोठं मोठया विद्यापिठात जाऊन शिकण्याशिवाय पर्याय नाही. गावाखेड्यातील कुचकामी आणि दर्जाहीन शिक्षण घेऊन वंचित वर्गातील विधार्थ्यांचं काडीचाही फायदा होणार नाही आणि इथला वंचित, परीघावर असलेला वर्ग असं दर्जाहीन शिक्षण घेऊन मानवी आत्म सन्मान नसलेलं दर्जाहीन आयुष्य जगावं असं इथल्या जातलिंगवर्ग आधारित शोषणकारी व्यवस्थेला नेहमीचं वाटतं आलेलं आहे. ही या व्यवस्थेला बदल म्हणून व्हिजन समोर ठेवून नेचर फाउंडेशन ग्रामीण भागात काम करत आहे. याचे बीज म्हणजे समीक्षा नन्नावरे.

.         चिमूर तालुक्यातील ग्रामिण भागातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरण नसल्याने सर्व विद्यार्थी चिमूर येथे नेचर अभ्यासिकेत शिक्षण घेत असतात. समीक्षा शंकर नन्नावरे मु. सोनेगाव, ता. चिमूर जि. चंद्रपूर हिचे आई वडील शेतकरी आहेत. समीक्षा चे प्राथमिक शिक्षण जि. प. शाळेत झाले तर माध्यमिक नेहरू विध्यालय चिमूर व पदवी शिक्षण कमला नेहरू महाविद्यालय, नागपूर येथून पूर्ण केले. त्यानंतर कोविड काळात नेचर फाउंडेशन च्या मोफत स्पर्धा परीक्षा शिकवणी वर्गात प्रवेश घेऊन नंतर यांच्या त्यासोबतच इतर सामाजिक कार्यात आवड म्हणून नेचर फाउंडेशन च्या माध्यमातून महिला सबलीकरण, एक रोपटं जन्म दिवसाच या उपक्रमात विषयावर काम सुद्धा केले आहे.

.         ही सध्या पुणे येथे स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करीत असतानाच येथे आय. आय. टी हैद्राबाद येथे एम. ए (डेव्हलपमेंट स्टडी) या करिता पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली याबद्दल नेचर फाउंडेशन चे संस्थापक निलेश नन्नावरे यांनी यात अर्ज करण्यास मार्गदर्शन केले. भारतातील विविध राज्यातील हजारो विद्यार्थ्यांनी ही लेखी परीक्षा दिली होती. या विद्यार्थ्यांमधून एक जागेकरिता तीन मुली मुलाखतीस निवडण्यात आल्या होत्या. यातुन समीक्षा ची निवड करण्यात आली. समीक्षा ही कोणतेही महागडे पैसा ची शिकवणी वर्ग न लावता या आय. आय. टी हैदराबाद येथे एम.ए (डेव्हलपमेंट स्टडी) मध्ये प्रवेश मिळविणारी व निवड होणारी चंद्रपूर जिल्ह्यातील व चिमूर तालुक्यातील अनु. जमाती प्रवर्गातील पहिली मुलगी आहे.

.         शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी काम करताना त्यांना गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाच्या संधी विषयी काहीच माहीत नाही. विद्यार्थ्यांमध्ये जसा माहितीचा अभाव आहे. तसच तो त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांमध्ये सुद्धा आहे. कारण त्यांच्या कुटुंबात तोच एक असतो जो पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करतो. ज्यांच्या आईवडिलांचे शिक्षण हे 12 पर्यंत होते. म्हणून आमचा विद्यार्थ्याला माहितीच्या अभावी हा 12 वी नंतर उत्कृष्ट शैक्षणिक संस्थेत शिक्षण घेण्याचा विचारही डोक्यात येत नाही. मग तो “12 नंतर डिएड नंतर बीएड आणि नंतर एमेड” नाहीतर मग “12 वी नंतर बीए, एम ए, बीएड, एम एड” अशा शिक्षणाच्या पारंपरिक चौकटीत अडकून राहतो. याही नंतर काय तर मग आणि घरच्यांना व नातेवाईकांना सांगण्यासाठी स्पर्धा परीक्षा”. विज्ञान शाखेचे विद्यार्थी सुद्धा यापेक्षा फारसा वेगळा विचार करताना दिसत नाही. हेच तो का करतो? त्यांचा नेमका उद्देश काय? तर याचं उत्तर त्याच्याकडे नसतेच.

.         तळागळातील विद्यार्थ्यांना नामांकित संस्थांमधील गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाच्या संधी काय आहेत? याची जागृती आणि मार्गदर्शन करण्यासाठी नेचर फाउंडेशन संस्था गेल्या चार वर्षांपासून ग्रामीण भागात कार्यशाळा आयोजित करीत आहे. यामुळे OBC, SC, ST, NT, VJ, NT, SBC या बहुजन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पारंपरिक शिक्षणाची चौकट मोडावी यासाठीच नेचर फाउंडेशन ग्रामीण भागात काम करत आहे.

.         या समीक्षा च्या प्रवेशाची ही चर्चा संपूर्ण चिमूर जवळील पदवी, पदव्युत्तर महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आदर्श ठरली आहे. नेचर फाउंडेशन विदर्भातील विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षांपासून लोकल टू ग्लोबल व ग्लोबल टू लोकल या थीम वर काम करून उच्च शिक्षणात देश स्वातंत्र्यनंतर ग्रामिण उच्च शिक्षणातील असणारी दुरी कमी करावी यासाठी कायमस्वरूपी अर्ज करून देण्यापासून तर कॉलेज, होस्टेल, प्रवेश मिळविण्यासाठी मोफत मार्गदर्शन व जबाबदारी घेऊन काम करीत आहे. याचाच फलित म्हणजे समीक्षा नन्नावरे आहे. अशी माहिती निलेश नन्नावरे संस्थापक नेचर फाउंडेशन यांनी दिली.

“माझं स्पर्धा परीक्षा जग सोडून माझी आय. आय. टी मध्ये निवड झाली याचे सर्व श्रेय नेचर फाउंडेशन ला आहे. यांच्या मार्गदर्शनामुळेच माझी निवड झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अशा ठिकाणी प्रवेश घ्यावा.”                                                                                                                                                                                                                                                    समीक्षा नन्नावरे                                                       (आय.आय.टी हैद्राबाद निवड विद्यार्थी)

“नेचर फाउंडेशन ग्रामिण भागांतील विद्यार्थ्यांना पुढील पाच वर्षात नामांकित उच्च शिक्षणात कमी असलेल्या प्रमाणात नक्कीच वाढ करेल याकरिता विद्यार्थ्यांची जबाबदारी सुद्धा घेईल.”                                                                                                                                                                                                                                                                                                         निलेश नन्नावरे                                                              (संस्थापक नेचर फाउंडेशन)