चार वर्षाच्या बालीकेवर नराधमाचा अत्याचार

45

चिमूर पोलिसांनी आरोपीला केली अटक

नेरी : चिमूर तालुक्यातील कन्हाळगाव येथील पंचेचाळीस वर्षीय नराधम नातलगाकडे तालुक्यातीलच गावात बुधवारला लग्नाला आला होता. त्याची नजर गावातील चार वर्षीय बालीकेवर गेली. त्यांने तिला जवळच असलेल्या शेताकडे नेऊन अत्याचार केल्याची घटना रात्रो ८.३० च्या दरम्यान घडली असुन नराधमाचे नाव श्रीकृष्ण चौधरी असे आहे.

.       तालुक्यातील एका गावात बुधवारला लग्न समारंभ होते. या लग्नास भिसी नजिकच्या कन्हाळगाव येथील श्रीकृष्ण चौधरी हा आला होता. या लग्नात पिडित बालीकेचे वडील भोजन वाटपाचे काम करीत होते. त्यामुळे ति बालीका वडीला कडे व घरा कडे चकरा मारत होती. रात्रो ८. ३० च्या सुमारास बालीका लग्नमंडपा कडे आली असता. आरोपीने बालीकेला शाळेजवळील शेतात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. बालीकेच्या शोधात तिची आई असताना बालीका रडत रडत घटनास्थळाकडून येताना दिसली. तिचे मागे नराधम श्रीकृष्ण येत होता. बालिकेने आईला अत्याचाराची माहीती दिली. हे एकताच आई व उपस्थित नागरीकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला. आईने घटनेची तक्रार चिमूर पोलिस स्टेशनला केली. पिडित बालीकेला तात्काळ उपचार व तपासणी करीता रात्रोच चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. आरोपीला अटक करून त्याच्यावर गुन्हा नोंदविण्यात येत असुन पुढील तपास ठानेदार संतोष बाकल यांचे मार्गदर्शनात पोलिस उप निरीक्षक दिप्ती मरकाम करीत आहेत.