उष्मघाताने शेतमजूराचा दुर्दैवी मृत्यू

36

खांबाळा येथील घटना

नेरी परिसरात उष्माघाताचा पहिला बळी

नेरी : मागील आठ दिवसांपासून उन्हाचा तडाका फार वाढलेला आहे त्यामुळे जीवाची लाही लाही होत आहे. मात्र अशातही शेतकरी, शेतमजूरांना शेतीच्या मशागती साठी जावंच लागते. या उष्णतेचा फटका चिमूर तालुक्यातील खांबाळा येथील शेतमजूरला बसला. आनंदराव गोपाळा ताजने (70) असे उष्मघाताने बळी ठरलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

.       नेरीवरून जवळ असलेल्या खांबाडा येथील आनंदराव गोपाळा ताजने वय 70 वर्षे या शेतमजूराचा शेतात काम करीत असताना अचानक प्रकृती बिघडली असताना घरी विश्रांती साठी आले असता खूपच अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णवाहिका बोलावून उपचाराकरिता नेत असताना वाटेत दुपारी 1 वाजता त्यांचा दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे खांबाडा गावात शोककळा पसरली आहे.

.       खांबाडा येथील गरीब शेतमजूर आनंदराव ताजने हे ठणठणीत प्रकृती चे होते. नेहमीच शेतात जाऊन शेतीचे कामे करायचे गुरुवारी सकाळी शेतात काम करायला गेले असता अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि घरी येताच त्यांना बरे वाटत नसल्याने तात्काळ रुग्णवाहिका बोलावून त्यांना उपचारासाठी नेत असताना वाटेत त्यांचा दुर्दैवी निधन झाले. सदर निधन हे उष्माघाताने झाले असल्याची चर्चा नागरिक करीत असून त्यांच्या जाण्यामुळे कुटूंबावर आघात झाला आहे. त्यांना तीन मुले पत्नी बराच मोठा आप्त परिवार आहे.