चिखली येथील तलावाच्या वेस्टवेअरला भगदाड

34

खरीप हंगामापूर्वी दुरुस्तीची मागणी

मुल : मुल तालुक्यातील चिखली येथे असलेल्या तलावाच्या वेस्टवेरचे काम जवळपास दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाच्या वतीने करण्यात आले. मात्र अल्पावधीतच या वेस्टवेरला माती वाहून गेल्याने मोठे भगदाड पडले आहे. यामुळे पावसाळ्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

.      चिखली येथील तलावाच्या भरोशावर शेकडो हेक्टर शेत जमिनीचे सिंचन अवलंबून आहे. तलावाच्या वेस्ट वेअरला भगदाड पडल्याने पावसाळ्याच्या दिवसात वेस्ट वेअर फुटून जलसाठा रिकामा होऊ शकतो. त्यामुळे शेकडो हेक्टर शेत जमिनीला धोका होऊन नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. त्यामुळे संबंधित विभागाने वेस्टवेर ची दुरुस्ती करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

निकृष्ट दर्जाचे बांधकाम                                                                                                                                                                    दोन वर्षांपूर्वी या तलावाच्या दुरुस्तीचे काम कंत्राटदराने केले मात्र सदर काम अंदाज पत्रकाला डावलून केल्याचा आरोप शेतकर्यानी केला आहे तर सदर काम सुरू असताना या कामावर माहिती फलक लावला गेला नसल्याने या कामासंबंधीची माहिती प्रशासनाने गुलदस्त्यात ठेवली. सदरकाम कोणत्या योजनेअंतर्गत किती लाख रुपयाचं काम करणारी यंत्रणा कोण याबाबत शेतकरी अजूनही अन्नभिन्न आहेत. सदर तलावाचे काम निकृष्ट झाले असून वेस्टवेरला भगदाड पडल्याने पावसाळ्यात तलावाला धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने खरीप हंगामाच्या पूर्वी या तलावाची दुरुस्ती करावी.                                                                                                         नितीन वाकुडकर, शेतकरी चिखली