सायन्स अकॅडमी नेरी, चिमूरच्या विद्यार्थ्यानी शालांत परीक्षेत मारली बाजी

45

100 टक्के निकाल लावीत उज्वल यशाची परंपरा ठेवली कायम

नेरी : नुकत्याच झालेल्या इयत्ता दाहवी च्या शालांत परीक्षेचा निकाल लागला यात सायन्स अकॅडमी नेरी/चिमूर च्या विद्यार्थांनी बाजी मारीत उज्वल यशाची परंपरा कायम ठेवीत शंभर टक्के निकाल लावला.

.       दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रोहिणी चाफले 94 टक्के, पार्थ चाफले 92 टक्के, मधुरा पिसे 91टक्के गुण घेऊन तालुक्यात अव्वल ठरले तर 42 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत 70 विद्यार्थी प्रथम श्रेणीत गुण घेऊन यशस्वी झाले अनेक विद्यार्थ्यांनी गणित व विज्ञान विषयात पैकी च्या पैकी गुण प्राप्त करत सायन्स अकॅडमी ची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवीत माना चा तुरा लावीत आपली व आपल्या गावाची शान राखली.

.       बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार सायन्स अकॅडमी ने विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी चँग बांधला असून कठोर परिश्रमाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांना घडविण्याची किमया करीत यश प्राप्त करून दाखवीत यशाची पायरी दाखवली. या काळात शिक्षणाशिवाय प्रगती करणे कठीण आहे. आणि ग्रामीण विद्यार्थ्यांना या प्रगती च्या मार्गाने वाट दाखवण्या साठी तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांला यश प्राप्त करून देणे हे ध्येय असून ग्रामीण विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास हेच आमचे ध्येय असल्याचे सायन्स अकॅडमी चे प्रा. आशिष गभने यांनी बोलून दाखवीले.

.       यात ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. सोबत सर्व अकॅडमी च्या शिक्षकांनी सुद्धा जिद्द व चिकाटी ने परिश्रम घेतल्याने हे यश दरवर्षी पदरी पडीत असल्याचे बोलून दाखविले आहे. यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना अभिनंदन करत त्यांच्या पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या असून विद्यार्थ्यांनी व पालकांनी सुद्धा अकॅडमी चे मनःपूर्वक आभार मानले आहे.