विविध उपक्रमानी श्री गुरुदेव बाल संस्कार शिबीर संपन्न

42

वरोरा : “या कोवळ्या कळ्यामाजी, लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकसता प्रगटतील समाजी, शेकडो महापुरुष.” राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या ग्रामगितेत वरील ओवीत आपले विचार प्रगट करतांना उद्याचे भविष्य घडविण्यासाठी संत महात्मे व राष्ट्रापुरुष निर्माण करण्यासाठी आजच्या बालकांना संस्काराचे धडे देण्याचे जणू आवाहन केले आहे, याचं सूत्राचे पालन करत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतून श्री गुरुदेव बाल संस्कार समिती टेमुर्डा यांनी वरोरा तालुक्यातील पाचगाव येथे दहा दिवशीय बाल संस्कार शिबिराचे यशस्वी आयोजन केले होते.

.      16 मे ते 26 मे 2024 या अकरा दिवसात 8 वर्षाच्या बालकासह 16 वर्षाच्या बालकांना सामुदायिक प्रार्थना, रामधून, भजन, योगा व स्वरक्षणासाठी मलखाम, ज्युडो कराटे इत्यादीची प्रशिक्षण देण्यात आले, समारोपीय कार्यक्रमात बाल संस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांनी ज्युडो कराटे व योगाचे प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितीत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

.      सतत 10 दिवस चाललेल्या या बाल संस्कार शिबिराचा समारोप काल दि. 26 जून ला करण्यात आला, या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय गुरुदेव विचार व प्राचारक कीर्तनकार डॉ. प्रशांत ठाकरे राष्ट्रीय, प्रमुख पाहुणे म्हणून सेवकराम मिलमिले संचालक ग्रामगिता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर पंढरपूर ह. भ. प. खीरटकर महाराज डोंगरगाव, जनार्दन देठे गुरुजी अध्यक्ष ग्रामगिता तत्वज्ञान सक्रिय दर्शन मंदिर पंढरपूर तथा श्री गुरुदेव बाल सुसंस्कार शिबीर पाचगाव चे मुख्य मार्गदर्शक प्रा. मुरकुटे गुरुजी चंद्रपूर, पाचगाव चे पोलीस पाटिल गेडाम, नायदेव चे पोलीस पाटिल विनोद विधाते शेगांव चे ठाणेदार योगेश्वर यादव आणि चंद्रपूरचे विजय देरकर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हितेश घुगल गुरुदेव विचारक कीर्तनकर आशिष माणुसमारे यांनी केले.

.     या 10 दिवसीय कार्क्रमासाठी प्रशिक्षक म्हणून लाभलेले सर्वश्री देठे गुरुजी, परमात्मा पांढरे, आशिष माणुसमारे, डुकरे, करन नेवारे, राणे, हितेश घुगल, शैलेश खीरटकर, डुकसे, भोयर, जिवतोडे यांनी कार्य केले, दहा दिवसाच्या भोजनाचा व नाश्त्यांचा खर्च पाचगाव येथील नागरिकांनी व इतर मान्यवरांनी केला, समारोप कार्यक्रमासाठी पाचगावातील व आजूबाजूच्या गावातील शेकडो मंडळी आली होती.