छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय कोंढाचा निकाल १०० टक्के

41

उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम

विद्यालयाकडून गुणवंतांचा सत्कार

भद्रावती : नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ विरूर, विरूर (स्टे.) संचालीत छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय कोंढाचा १०० टक्के निकाल लागला असून या विद्यालयाने आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा यंदाही कायम राखली आहे.

.       मार्च २०२४ च्या बोर्डाच्या परीक्षेसाठी एकूण 34 विद्यार्थी बसले होते. त्यात सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 19 विद्यार्थी प्राविण्य श्रेणी, 13 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 1 विद्यार्थी द्वितीय श्रेणी व 1 विद्यार्थी तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाला. या उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये. प्रांजली राजुरकर या विद्यार्थिनीने 87 टक्के गुण मिळवून विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला. तर शितल पडाल हिने 86.40 टक्के गुण मिळवून द्वितीय स्थान प्राप्त केले. तृतीय स्थान श्वेता निब्रड हिने प्राप्त केले असून तिला 86.20 टक्के गुण मिळाले आहेत. या सर्व गुणवंत विद्यार्थी व पालकांसोबत शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते त्यांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन आणि पेढा भरवून सत्कार करण्यात आला.

.       यावेळी शाळेचे शिक्षक शेंडे, विधाते, तितरे, आगलावे, देवराव ढवस, गणेश चिकटे, संबाजी देवगडे उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थी त्यांच्या पालकांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांच्या यशात शिक्षकांचा महत्वाचा वाटा असल्याचे सांगितले.