कारच्या लाईटच्या प्रकाशात बुद्धाच्या मूर्तीचे अनावरण

55

विजेच्या लपंडावाने आला होता व्यत्यय

वरोरा :  तालुक्यातील परसोडा येथे गौतम बुद्धाच्या मूर्ती अनावरण 23 मे रोजी रात्री आठ वाजता आयोजित करण्यात आला होता. मात्र कार्यक्रमा दरम्यान अचानक वीज गेली. आता येईल मग येईल असे करत एक तास झाला मात्र वीज आलीच नाही. अखेर सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून आलेले सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नागापुरे यांनी आपल्या कार चे लाईट लावत लाईट च्या प्रकाशात तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले .

.        शांती, त्याग, सत्य, अहिंसेचे प्रतीक तसेच बौद्ध धर्माचे संस्थापक दुःखाचे कारण शोधणारे गौतम बुद्ध याच महामानव गौतम बुध्दाच्या मूर्तीच्या अनावरण कार्यक्रम होता.अचानक विद्युत व्यवस्था कोलमडली आणि वातावरण अंधकारमय झाले. ज्या गौतम बुद्धाने समाजाला अंधःकारमयातून प्रकाशाकडे आणले. संपूर्ण बौद्ध धर्म प्रकाशमय केला. मात्र मूर्ती अनावरण दरम्यान वीज गेली. वीज व्यवस्थेची दुसरी कोणतीही अशी पर्यायी व्यवस्था नव्हती. त्यावेळेस सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नागापुरे यांनी आपल्या स्वमालकीच्या कार चे दोन तास लाईट्स सुरु ठेऊन अनावरण, स्वयंपाक, महाप्रसाद कार्यक्रमासाठी योगदान व सहकार्य केले.

.        नागापूरे हे गोरगरिबांच्या मदतीला, कोणत्याही कार्यक्रमाला हातभार तर लावतातच आणि कार्यक्रमात येणाऱ्या अडचणी, समस्या दूर करण्यासाठी अग्रेसर असतात. परसोडा येथील स्वयंदीप बहुउद्देशीय समाज मंडळाचे सचिव प्रवीण लभाने आदी समाज बांधवानी प्रमोद नागापुरे यांचे आभार मानले.