विज्ञान, वाणिज्य, कला व एमसीव्हीसी शाखेत तालुक्यात अव्वल

163

भद्रावती : महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे मार्फत आज बारावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला. भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीने नेत्र दीपक यश संपादन केले आहे.

.       जाहीर झालेल्या निकालात यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेचा 98.73% निकाल लागला आहे. यात संजना गुरचल हिने 89.50% गुण प्राप्त करत महाविद्यालयात व तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तर श्रेयश नगराळे व ध्रुव गढीया या विद्यार्थ्यांनी 89.33% गुण घेत तालुक्यात व महाविद्यालया द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. मानस प्रभाकर पारधी या विद्यार्थ्यांने 84.83% गुण घेऊन महाविद्यालयातून तृतीय क्रमांक प्राप्त केला. विज्ञान शाखेतील 12 विद्यार्थ्यांनी 80 टक्के च्या वर गुण प्राप्त करून यशस्वी भरारी घेतलेली आहे.

.        याच कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचा निकाल 91.37% लागला असून तालुक्यात अव्वलस्थानी आहे. यात अनुष्का देवगडे या विद्यार्थिनीने 80 टक्के गुण प्राप्त करून तालुक्यात व महाविद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केला. पायल प्रकाश मेश्राम या विद्यार्थ्यांनी 89.33% गुण प्राप्त करून तालुक्यात व महाविद्यालयात द्वितीय क्रमांक प्राप्त केला तर रितिक मुसावत या विद्यार्थ्याने 75 टक्के गुण प्राप्त करून तालुक्यात व महाविद्यालयात तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.