बल्लारपूर तालुक्याच्या निकाल ९२.32 टक्के

55

उत्तीर्णामध्ये मुलींनी मारली बाजी

९ शाखेचा लागला १00 टक्के निकाल

विसापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२ वी परीक्षा मार्च २०२४ मध्ये घेतली. या परीक्षेचा ऑनलाईन निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. यंदाच्या निकालात पुन्हा एकदा उत्तीर्ण विद्यार्थ्यात मुलींनी बाजी मारली आहे. आज जाहीर झालेल्या बल्लारपूर तालुक्याच्या निकाल ९२.3२ टक्के लागला आहे. येथील विज्ञान शाखेतील ६, कला शाखेत २ तर वाणिज्य शाखेत एका महाविद्यालयाचा निकाल १00 टक्के लागला आहे.

.      बल्लारपूर तालुक्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी विज्ञान शाखेत १0१२ विद्यार्थी बसले होते.यापैकी ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.याची टक्केवारी ९८.२२ इतकी आहे. कला शाखेत एकूण 3६९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यापैकी २९६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.याची टक्केवारी ८0.२१ इतकी आहे. वाणिज्य शाखेत एकूण १0४ विद्यार्थ्यापैकी ८१ विद्यार्थी यशस्वी झाले.वाणिज्य शाखेची उत्तीर्ण टक्केवारी ७७.८८ इतकी आहे. बल्लारपूर तालुक्यात एकूण १४८५ विध्यार्थ्यांनी मार्च महिन्यात बारावीची परीक्षा दिली होती.यापैकी १3७१ विध्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत यश प्राप्त केले आहे. बल्लारपूर तालुक्यात बारावीचा निकाल ९२.3२ टक्के लागला आहे.

कला शाखेत ग्रामीण भागाचा दबदबा                                                                                                                                               बल्लारपूर तालुक्यात बारावीच्या कला शाखेच्या १0 तुकड्या आहेत.यामध्ये विसापूर येथील चिंतामणी कनिष्ठ महाविद्यालयाच्या 36 विध्यार्थ्यांनी यावर्षी कला शाखेतून बारावीची परीक्षा दिली. यापैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. येथील कला शाखेचा निकाल १00 टक्के लागला आहे. त्याचप्रमाणे बामणी ( दुधोली ) येथील बालाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कला शाखेत घवघवीत यश मिळविले आहे. येथून 30 पैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बल्लारपूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील या दोन कनिष्ठ महाविद्यालयाने कला शाखेचा निकाल शंभर टक्के दिला आहे. तर बल्लारपूर येथील भालेराव ज्युनिअर कॉलेज मधील वाणिज्य शाखेतील २१ विद्यार्थ्यापैकी सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत याचं एकमेव कॉलेजने शंभर टक्के निकाल दिला आहे.

विद्यार्थ्यांनाचा कल विज्ञान शाखेकडे अधिक                                                                                                                                           बल्लारपूर तालुक्यात विज्ञान शाखेच्या एकूण तुकड्या ११ आहेत. यावर्षी या शाखेत एकूण १0१२ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. यापैकी ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९८.२२ इतकी आहे. सर्वाधिक विद्यार्थी विज्ञान शाखेत प्रवेश घेत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडे असल्याचे दिसून येत आहे. बल्लारपूर तालुक्यात कोठारी येथील मारुती कनिष्ठ महाविद्यालय, बामणी ( दुधोली ) येथील बालाजी कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथील भालेराव जुनियर कॉलेज, के.जी.एन. पब्लिक ज्युनिअर कॉलेज, येणबोडी येथील कर्मवीर ज्युनिअर कॉलेज, बल्लारपूर येथील माऊंट विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, नांदगाव ( पोडे ) येथील स्व.गोपाळरावं वानखेडे कनिष्ठ महाविद्यालय येथील विज्ञान शाखेचा निकाल शतप्रतिशत लागला आहे.