चंद्रपूर जिल्ह्यात मुलींचाच डंका

32

93.89 टक्के निकाल

निकालाची टक्केवारी वाढली

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी – मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज मंगळवार दि.२१ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी ९३.८९ टक्के इतकी असून गतवर्षी पेक्षा यावर्षी निकालाची टक्केवारी वाढली आहे. यावर्षीही बारावीत मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.८० टक्के तर मुलांच्या निकालाची टक्केवारी ९२. टक्के इतकी आहे.

.        बारावीच्या परीक्षेसाठी २७ हजार ७०७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी २७ हजार ५१९ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यात मुले १३ हजार ८७२, तर १३ हजार ६४७ मुलींचा समावेश आहे. त्यातील २५ हजार ८४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षी मुलींनीच निकालात आघाडी घेतली आहे. मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.८० टक्के, तर मुलांच्या निकालाची टक्केवारी ९२.०२ टक्के आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून सर्वांत जास्त सावली तालुक्याचा निकाल असून ९८.०२ टक्के इतका आहे तर सर्वात कमी निकाल भद्रावती तालुक्याचा आहे.

.        विज्ञान शाखेसाठी १२ हजार ८५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यात मुल ६१०३, तर मुली ६७५३जणांचा समावेश होता. त्यापैकी १२ हजार ८११ जणांनी परीक्षा दिली. त्यात मुले ६०८२, तर ६७२९ मुलींचा समावेश आहे. विज्ञान शाखेत १२ हजार ६६८ मुल-मुली उत्तीर्ण झाले. (12th Result) विज्ञान शाखेत मुलांच्या निकालाची टक्केवारी ९८.४५, तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९९.२७ टक्के इतकी आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९८.८८ टक्के लागला.

.        कला शाखेत ११ हजार ९१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यात मुल ६०९३ तर ५८२५ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी ११ हजार ८०३ जणांनी बारावीची परीक्षा दिली. त्यात मुल ६०२६, तर ५७७७ मुलींचा समावेश आहे. कला शाखेतून १० हजार ४८० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात मुले ५१७२, तर ५३०८ मुलींचा समावेश आहे. कला शाखेतील मुलांच्या निकालाची टक्केवारी ८५.८२, तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९१.८८ इतकी आहे. कला शाखेचा निकाल ८८.७९ टक्के लागला. (12th Result) वाणिज्य शाखेसाठी १९०३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यात मुल ९७६, तर ९२७ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी १८९९ जणांनी परीक्षा दिली. त्यात मुल ९७२ तर ९२७ मुलींचा समावेश आहे.

.        या शाखेतून १७५३ विद्यार्थी उर्तीर्ण झाले. त्यात मुले ८७२ तर मुली ८८१ आहेत. या शाखेत मुलांच्या निकालाची टक्केवारी ८९.७१ टक्के, तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.०३ इतकी आहे. वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ९२.३१ टक्के लागला. एमसीव्हीसी शाखेसाठी १०१९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यात मुल ८०४, तर २१५ मुलींचा समावेश आहे. त्यापैकी ९९६ जणांनी परीक्षा दिली. त्यात मुल ७८३ तर २१३ मुलींचा समावेश आहे. या शाखेतून ९३० विद्यार्थी उर्तीर्ण झाले. त्यात मुले ७२६ तर मुली २०४ आहेत. या शाखेत मुलांच्या निकालाची टक्केवारी ९२.७२ टक्के, तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.७७ इतकी आहे. एमसीव्हीसी शाखेचा एकूण निकाल ९३.३७ टक्के निकाल लागला आहे.