विसापूर येथील शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरु

44

विसापूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने बल्लारपूर तालुक्यातील विसापूर ( भिवकुंड ) येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा सुरु आहे. या शाळेत इयत्ता सहावी ४0 जागेसाठी तर इयत्ता ७ ते दहावी पर्यंत रिक्त जागेनुसार मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून पालकांनी शाळेत येऊन पाल्यांचा प्रवेश निश्चित करावा, असे पत्रकाद्वारे कळविले आहे.

.       शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर प्रगत करण्यासाठी शैक्षणिक सत्र २0२४-२५ मध्ये सेमी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देण्यात येत आहे. आय. एस. ओ. मानांकन प्राप्त निवासी शाळेत उच्च दर्जाचे शिक्षण व निसर्गरम्य वातावरण आहे. या शाळेत अनुभवी शिक्षक वृंद,विज्ञान केंद्र, अध्यावत प्रयोगशाळा ई-लर्निग, डिजिटल क्लासरूम, ग्रंथालय, व्यायामशाळा, इंटरनेट, प्रोजेक्टर युक्त संगणक कक्ष, संगीत व मनोरंजन तथा उत्तम निवास व भोजन सुविधा देण्यात येत आहे.

.       सदर निवासी शाळेत अनुसूचित जाती ८0 टक्के,अनुसूचित जमाती १0 टक्के, विमुक्त व भटक्या जमाती ५ टक्के, विशेष मागास वर्ग २ टक्के व दिव्यांग विद्यार्थ्यासाठी तीन टक्के असे आरक्षण दिले जात आहे. शाळा प्रवेशासाठी पालकांनी विहित नमुन्यात अर्ज १0 जून २0२४ पर्यंत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, विशेष अधिकारी प्रतिभा भागवतकर, शाळेच्या मुख्याध्यापक बबीता हुमणे यांनी केले आहे.