वाघाच्या हल्ल्यात युवक ठार

152

खानगाव येथील येथील घटना

चिमूर : तालुक्यातील खानगाव येथील बुधवारी सकाळच्या सुमारास वाघाने हल्ला करून अंकुश श्रावण खोब्रागडे( ३४) या युवकास जागीच ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

.       मृतक अंकुश खोब्रागडे हा युवक नेहमीप्रमाणे शेतात जनावराची व शेती उपयोगी साहित्याची देखभाल करण्यासाठी नेहमीच शेतात रात्री झोपण्यासाठी जात होता. दरम्यान बुधवार सकाळी तो शेतपरिसरात प्रातविधी विधीसाठी नाल्याच्या परिसरात गेला असता दबा धरून असलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केलं.नियमित प्रमाणे तो सकाळी घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता ही घटना उघकिस आली.

.       सदर घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. सदर घटनेची माहिती मिळताच ब्रम्हपुरी वनविभागाचे सहायक वनंरक्षक हजारे, वनपरिक्षेत्र अधिकारी के. बी. देऊळकर, शेत्र सहायक यू.बी. घुघरे, औतकर, वनरक्षक हजारे आदी उपस्थित होते. सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून कुटूबियांच्या स्वाधीन करण्यात आले.

” मृताच्या नातेवाइकास एक लक्ष रोख व चार लक्ष धनादेश स्वरूपात प्रदान करण्यात आले असून परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले असून वन विभागाच्या कर्मचाऱ्याकडून गस्त करण्यात येत आहे.”                                                                                                                                                                                               यू.बी. घुघरे क्षेत्र सहायक, खडसंगी.