अमृत जल योजनेत करोडोंचा घोटाळा

55

राष्ट्रवादीची ईडीकडून चौकशीची मागणी

चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील रहिवाशांची तहान शमवण्यासाठी 2017 मध्ये केंद्र, राज्य आणि महानगरपालिका चंद्रपूर यांच्याकडून बक्षीस मिळालेल्या अमृत जल योजनेचे काम आजतागायत सुरू असून यामध्ये 5 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा झाला आहे. त्यामुळे या योजनेची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका निवेदनाद्वारे केली.

.       पहिली अमृत जल योजना 2017 मध्ये लागू करण्यात आली. त्याची एकूण रक्कम 234 कोटी आहे. आणि या योजनेचे काम सन 2019 मध्ये पूर्ण होणार होते. मात्र ते काम पूर्ण झाले नाही. त्यासाठी महापालिकेने संबंधित ठेकेदाराला एक वर्षाची मुदत वाढवून दिली. मात्र आता सात वर्षे होऊनही ही योजना लागू झालेली नाही.

.       महानगरपालिकेने संबंधित कंत्राटदाराला 200 कोटी रुपये दिले. या अपूर्ण अमृत जल योजनेसाठी पुन्हा 250 कोटींची वाढ करण्यात आली. मात्र शहरात अमृत जल योजनेचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. त्यामुळे या योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे.