तबला वादनात कुंदन गुडधे केंद्रातून प्रथम

35

नेरी : नेरी या गावापासून दोन किमी अंतरावर असणारे सरडपार या गावातील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा प्रचार आणि प्रसार जनसामान्य जनतेमध्ये पोहोचवणाऱ्या, उपासिका कमलाबाई गुडधे यांचा भाचा कुंदन लक्ष्मीकांत गुडघे याला लहानपणापासून धार्मिक कार्याची आवड असल्याने त्यांनी या वर्षाला तबला वादनात केंद्रातून प्रथम क्रमांक प्राप्त केला, असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

.       कुंदन हा शेतकरी मोलमजुरी करणाऱ्या परिवारातील कुटुंबातील असून, घरात धार्मिक वातावरण व संगीताची आवड असल्याने कुंदनला लहानपणापासूनच भजनाची तबलावादनाची आवड निर्माण होती. त्यामुळे त्याच्या आत्याने मानव सेवा छात्रालय विद्या मंदिर गुरुकुंज मोझरी येथील तबला शिक्षक निलेश इंगळे यांच्याकडे कुंदनला तबलावादनाचे धडे घेण्यास पाठवले, त्यांनी तबलावादनाचे परिपूर्ण धडे शिक्षण दिले. मानव सेवा छात्र विद्या मंदिर गुरुकुंज मोझरी येथे वर्ग सात मध्ये शिकणाऱ्या कुंदनची अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मिरज मुंबई द्वारा प्रवेशिका पूर्ण या विषयावर तबलावादनाची स्पर्धा गुरुकुज मोझरी येथे परीक्षा घेण्यात आली, त्यात उत्कृष्ट प्रदर्शन करीत कुंदनने तबलावादनात केंद्रातून प्रथम क्रमांक मिळवला, असून त्याच्यावर कौतुकाचा अभिनंदनचा वर्षा होत आहे.

.       त्याला या तबलावादनाची या धार्मिक कार्याची आवड याचे सर्व श्रेय कुंदनने त्याची आत्या कमलाबाई गुडधे राहणार सरडपार यांना दिले. तसेच त्यांचे कौतुक त्यांची आजी शांताबाई गुडघे, आई कविता गुडघे, वडील लक्ष्मीकांत गुडघे, आणि नातेवाईकांनी भरभरून त्याचे कौतुक या यशाबद्दल केले आहे.