वरोरा उपविभागात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा

41

वरोरा : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने वरोरा उपविभागात, उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व क्षेत्रीय अधिकारी, पोलीस, एफ.एस.टी., एस.एस.टी., व्ही.व्ही.टी., व्ही.एस.टी. तसेच विविध समित्यांचे नोडल अधिकारी व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक वरोरा येथील तहसील कार्यालयात नुकतीच घेण्यात आली.

.      या बैठकीत वरील सर्व अधिकारी व समितीतील सदस्यांना समितीचे कार्य व करावयाची कार्यवाही याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी लंगडापुरे यांनी सर्व समित्यांचे नोडल अधिकारी, भरारी पथकांचे प्रमुख, सहाय्यक कर्मचारी यांची आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले. या बैठकीत सर्व समित्यांच्या नोडल अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला व आगामी काळातील आवश्यक बाबींची पूर्वतयारी करण्याबाबत विचारणा केली. तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना व जिल्हाधिकाऱ्यांकडून प्राप्त आदेशांच्या तात्काळ अंमलबजावणीचे आदेशही सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले.

.      बैठकीला उपविभागीय अधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांच्यासह वरोराचे तहसीलदार योगेश कोटकर, गटविकास अधिकारी गजानन मुंडकर, तालुका कृषी अधिकारी सुशांत लव्हटे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गजानन भोयर, नायब तहसीलदार मधुकर काळे यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी व सर्व नोडल समिती सदस्य उपस्थित होते.