शंकरपटाच्या नावाखाली झेंडामुंडीचा “जुगार”

38
  • वाघेडा येथील धक्कादायक प्रकार

नेरी : चिमूर तालुक्यातील नेरी जवळील वाघेडा येथे बैल जोडी चा शंकरपट १५ दिवसापासून सुरु आहे. शंकरपटाच्या नावाखाली काही जुगारबाज त्या ठिकाणी झेंडा मुंडी चा खेळ चालवीतांना दिसत आहे. या झेंडामुंडी च्या खेळात लाखो रुपयाची उलाढाल होत असल्याचे बोलल्या जात आहे.

.      चिमूर तालुक्यातील वाघेडा येथे दरवर्षी शंकरपटाचे आयोजन केल्या जाते. शंकरपट हा शेतकऱ्यांसाठी तसेच गावकऱ्यांसाठी एक उत्सवच असतो. हा शंकरपट पाहण्याकरिता पंचक्रोशीतून लोक येतात. त्यामुळे येथील व्यवसायाला चालना मिळत होती.या शंकरपटात दोन जोड्या सोडल्या जातात जी जोडी पहिले झेंडी पाडेल तिला विजयी घोषित करून बक्षीस दिल्या जाते, जी जोडी कमी वेळात अंतर कापेल,ती जोडी विजयी ठरते. या शंकरपटासाठी चिमूर, सिंदेवाही तालुक्यातील कानाकोपऱ्यातून शेतकरी बैलजोड्या आणून या स्पर्धेत खेळविल्या जातात. सर्जा-राजावर जिवापाड जपणारा शेतकरी बैलगाडा शर्यतीसाठी अक्षरक्ष: वेडा होतो. मात्र या शंकरपटाचा फायदा काही जुगारबाज घेत असुन शंकरपट पाहण्यासाठी येत असलेल्या नागरिकांना झेंडी मुंडी कडे आकर्षित करतांना दिसत आहे. या झेंडा मुंडीत लाखो रुपयाची उलाढाल होत असुन अनेकांची खिसे खाली होत असल्याने हिरमुसून नागरिक गावाकडे जाताना दिसत आहे. या गोरख जुगार खेळा मुळे खऱ्या शंकरपट भरविण्याऱ्या मंडळावर सुद्धा संक्रात येणार कि काय अशी पटप्रेमी कडून प्रतिक्रिया उमटत आहे. या नंतर असंच प्रकार होत राहिले तर ग्रामीण भागात प्रसिद्ध असलेली बैलगाडीची शर्यत आता बंद होण्यास वेळ लागणार नाही .हे मात्र खरे आहे.

.      . या जुगारबाजावर जात आहे. तब्बल दोनदा चिमूर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. मात्र पोलीस विभागाला न जुमानता झेंडीमुंडीचा खेळ रोज सर्रास सुरू आहे. यामुळे पोलीस विभागाला हे अवैध व्यवसायिक आव्हान तर देत नाही ना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा पोलीस विभागाने या अवैध व्यवसायिकांच्या मुसक्या आवळून शंकरपट सुरळीत सुरू ठेवावा अशी मागणी पटप्रेमी शेतकरी बंधू कडून होत आहे.

सदर शंकर पट भरविणार्या मंडळाने झेंडीमुंडी व्यवसायिकाला परवानगी दिली असेल तर त्या आयोजक मंडळावर सुद्धा गुन्हे दाखल करावे. कारण चे सर्व व्यवसायिक बाहेर गावचे असून विना परवानगी ते येऊ शकत नाही. आणि जुगार खेळू शकत नाही. यांच्यामुळे शंकर पट बदनाम होत असून अनेक शेतकरी ह्या जुगारामुळे बरबाद होत आहेत. तेव्हा लाखो रुपयाचा जुगार खेळून कुटूंब उद्धवस्त करीत आहेत. तेव्हा याची सुद्धा चौकशी करून झेंडीमुंडी चा जुगार पोलीस विभागाने बंद करावा अशी मागणी शंकरपट प्रेमी कडून केली जात आहे.