कुचना वसाहत येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध रंगारंग कार्यक्रम

35

कुचना : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून  कुचना येथे महिलांसाठी विविध रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्याप्रमाणात महिलांचा सहभाग नोंदविला.

.    या दरम्यान विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.  यात पाककला स्पर्धा घेण्यात आला. यामध्ये प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांक देण्यात आले पाककलेत थिम होती आंबा किंवा कैरी पासून व्यंजन तयार करणे हे होते.  त्यानंतर एकल, आई मूलगी, आई मूलगा, सासू सून, यांचे युगल गीत नृत्य ठेवण्यात आले होते.  तसेच विविध प्रकारचे सामूहिक नृत्य ठेवण्यात आले होते. दरम्यान आरती कुचनकर यांनी लावणीतून मंचावरून सर्वांच्या नजरा रोखून धरल्या.  तर काहींनी जागेवरच फिरकी घेऊ इच्छित होत्या. सर्व महिलांनी कार्यक्रमात आप आपले योगदान दिले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व महिला भगिनींनी “बाई पण लय भारी देवा” या चित्रपटाची आठवण करून दिली. आणि या चित्रपटाच्या गाण्यांवर नृत्य पण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान एकपात्री प्रयोग यामधून स्त्रियांमधील सुप्त गुण दिसून आले. महिला भगिनींचा या कार्यक्रमाची प्रशंसा परिसरातील नागरिक करीत आहे.

.    या कार्यक्रमाला सुरभी महिला मंडळाच्या अध्यक्षा कुमार, अग्रवाल, राय, दुपारे, नागदेवे तसेच एकता ग्रामीण महिला मंडळाच्या अध्यक्षा माहेश्वरी निंबाळकर, सचिव निमकर, सहसचिव सातपूते, संघटन कार्यकारी गोहकार, कोषाध्यक्ष पोटे, गूजूला, प्रसाद, महतो व कार्यकर्त्या उपस्थित होत्या, परिक्षक म्हणून तुरकर, काळे व बंड  यांनी उत्कृष्टरित्या आपली जिम्मेदारी पार पाडली.