जागतिक महिला दिना निमित्त महिला पोलिस पाटलांचा सत्कार

29

वरोरा : शेगाव पोलिस स्टेशन च्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट काम करणाऱ्या दोन महिला पोलीस पाटील यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आले.

.       मेसा येथील महिला पोलिस पाटील मयुरी सतीश वर्भे आणि प्रतिभा चंद्रकांत पिंपळकर यांचा प्रतिनिधिक स्वरूपात सत्कार ठाणेदार शैलेंद्र ठाकरे यांनी केला. तसेच पडोळे यांचा पदोन्नती बद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी पोलीस पाटील आनंद थुटे, थुल, सोयाम, गणवीर, हनवते, येरमे, सांगोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष दिपक निब्रड यांनी जागतिक महिला दिनाची सुरवात व महिलावरील अन्यायला वाचा फोडली. तर कार्यक्रमचे अध्यक्ष ठाणेदार ठाकरे यांनी जुन्या रूढी प्रथा परंपरा व आजची स्त्री यात होत गेलेल्या बदलाचे महत्व सांगून शिक्षणाचे फायदे समजावून सांगितले.

.       पोलीस स्टेशन शेगाव बू येथील सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची परंपरा कायम ठेवत ठाणेदार ठाकरे यांनी हा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम थोडा उशिरा घेतला कारण ८ मार्च हा जागतिक महिला दिन होता परंतु त्या दिवशी महाशिवरात्री ची ३ दिवस भटाळा येथे जत्रा होती आणि त्या जत्रेला लाखो भाविक येत असतात. त्यात कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कडक बंदोबस्त करून स्वतः तिथे राहून जत्रा शांततेत पार पाडण्यात त्यांना मोठे यश आले आणि आज जागतिक महिला दिनाचाही कार्यक्रम त्यांनी यशस्वी केला. त्यातच त्यांनी येणाऱ्या निवडणूक विषयी, होळी विषयी सूचना दिल्या व सर्व पोलीस पाटील यांचे आभार मानले.