- वनकर्मचारी व कंत्राटदाराची सावरासावर
- नेरी क्षेत्रातील वृक्ष तोड प्रकरण
नेरी : तळोधी वनपरिक्षेत्र अंतर्गत नेरी क्षेत्रातील झाडाची नियमांना बगल देत कंत्राटदाराने झाडे तोडली. मात्र झाडे तोडण्यासाठी कंत्राटदाराने वनविभागाची परवानगीच घेतली. मात्र शेतकर्यांच्या सातबार्यावर झाडांची नोंद नसतांना डिजिटल सातबारावर चक्क पेनीने हस्तलिखित सागवन झाडांची नोंद दाखवून बोगस सातबारा तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
. चिमूर तालुक्यातील नेरी जवळील तळोधी वनपरिक्षेत्र अंतर्गत नेरी क्षेत्रातील सावरगाव, कारघाटा, चिखलापार, खरकाडा शेतशिवारातील नाल्यातील व मुख्य मार्गावारील आंबे, साग, आजन, नीम, आदी सह इतर अनेक झाडाची वनविभागाच्या नियमांना बगल देत कंत्राटदाराने कत्तल केली. सदर कत्तल ही एक महिना पूर्वीपासून सुरू आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई न करता शेतकऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे मात्र अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. आता मात्र सदर प्रकरणाला वेगळेच वळण आले असून शेतकऱ्याच्या सातबारावर साग वृक्षाची नोंद नसतांना डिजिटल सातबारावर हस्तलिखित साग वृक्ष नोंद दाखवून बोगस सातबारावर सागवणाचे वृक्ष तोडण्याची परवानगी क्षेत्र सहाय्यक यांनी दिलीच कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
. सातबारा वर डिजिटल नोंदणी सुरू झाल्यापासून कोणतेच तलाठी हे डिजिटल सातबारावर हाताने लिहून कोणतीही नोंद देत नसताना मात्र सदर सातबाऱ्यावर पेनाने वृक्ष चढवून बनावट सातबारा तयार करून कंत्रादाराला हाताशी धरून संपुर्ण साग वृक्षाची कत्तल केली हे मात्र आता उघड झाले आहे. मात्र यात शेतकऱ्यांची सपशेल फसवणूक केली असून स्वतःच्या बचावासाठी शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करून अधिकाऱ्यांच्या बचावासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी तात्काळ क्षेत्र साहायक अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी तसेच कंत्राटदारावर सुद्धा कारवाई करून काळया यादीत टाकावे अशी मागणी प्रहार संघटना व नागरिक करीत आहेत
. सदर प्रकरणात ज्या शेतकऱ्याच्या शेतातील साग वृक्षाची कत्तल केली आहे त्या शेतकऱ्याच्या शेतातील सातबाऱ्यावर साग वृक्षाची नोंदच नाही सदर सातबारा क्षेत्र सहायक अधिकारी यांना सादर करण्यात आला त्यावर पेनाने साग वृक्ष ची नोंद करण्यात आली याबाबत अधिकारी यांना विचारले असता त्यांनी बनवाबनवी उत्तरे दिली असून शेतकऱ्यांनी तश्या प्रकारे नोंद असलेला सातबारा दिला असे सांगितले.
. या प्रकरणी संबंधित क्षेत्रासहायक अधिकारी यांनी कंत्राटदाराला हाताशी धरून संपूर्ण साग वृक्षाची कत्तल केली आणि शेतकऱ्याला फसविले अशी नागरिकांत चर्चा सुरू असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी वनविभागाने करावी सदर अधिकाऱ्याला निलंबित करून कंत्रातदारावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
सातबारा वर कोणतीही नोंद हत्सलिखीत घेता येत नाही सातबारा नोंद डिजिटल सुरू झाल्यापासून कोणत्याही सातबारा वर कोणतीही नोंद हत्सलिखीत घेता येत नाही, सदर प्रकारची माहिती मला वृत्तपत्रबातम्या मधून मिळाली व सादर प्रकरणात हस्तलिखित नोंद असेल तर तो बोगस सातबारा आहे. त्यामुळे असे बोगस प्रकार करणाऱ्यावर कारवाई व्हावी. प्रवीण ठोंबरे, तलाठी, वडाळा पैकु