बल्लारपुरात बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली जखमी

36
  • नागरिकांत दहशतीचे वातावरण
  • वन विभागाविरोधात नागरिकाचा आक्रोश

विसापूर : बल्लारपूर शहरातील पेपर मिल मिल न्यू कॅलोनी, बांबू डेपो परिसरात मागील काही दिवसापासून वन्य प्राण्याचा संचार वाढला आहे. अशातच आज बुधवारी सकाळी ८ वाजता दरम्यान एक मुलगी अंगणात खेळत होती. ध्यानिमनी नसताना बिबट्याने त्या मुली वर झडप घालून जंगलाच्या दिशेनी धूम ठोकली. मात्र नागरिकांनी प्रतिकार केल्यामुळे तिची सुटका झाली. बिबट्याच्या हल्ल्यात ती मुलगी गंभीर जखमी असून तिच्यावर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार केला जात आहे. या घटनेत जखमी झालेल्या मुलीचे नाव सोफिया इक्बाल शेख वय ७ वर्ष, रा. पंडित दिनदयाळ वार्ड, बल्लारपूर असे आहे. या मुलीला आई वडील नसून तिचा सांभाळ आजी करत असल्याची माहिती आहे.

.        बुधवारी सकाळच्या सुमारास सोफिया ही अंगणात खेळत होती. अंगणात खेळत असताना बिबट्याने तिच्यावर झडप घेतली. त्यावेळी ती एकदम जोरजोराने रडायला लागली. तिच्या रडण्याचा आवाजाने काका बाहेर आले. तेव्हा बिबट्या त्या मुलीला पकडून जंगलात नेत असल्याची जाणिव झाली. त्यावेळी नागरिकांनी व मुलीच्या नातेवाईकांनी मोठ्या शिताफीने तिला बिबट्याच्या तावडीतून सोडविले. यात झटापटीत ट्रक चालक मोहनदास देखील जीवाच्या आकांताने त्या मुलीला बिबट्याच्या तावडीतून सोडविण्यासाठी प्रयत्न केला.हा थरार अनेकांनी अनुभवला.

.        सोफिया शेख हिला बिबट्याच्या तावडीतून सोडवून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले आहे.या घटनेची माहिती बल्लारपूरचे वन परीक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांना देण्यात आली. या भागात बिबट व वाघाचा संचार वाढला असून वन्य प्राण्याच्या हल्ल्यात आजतगायत अनेक जण जखमी झाले आहे. यामुळे या भागातील नागरिकात वन विभागा विरोधात आक्रोश वाढला आहे. वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी चार ठिकाणी पिंजरे लावले असून कर्मचाऱ्यांची गस्त वाढविली आहे.