महिला दिनाचे औचित्य साधत रक्त तपासनी व व रक्तदान शिबीर

78

नागभीड : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नागभीड येथील रुख्मिणी सभागृहात महिलांचे रक्त तपासनी व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

.    या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर विद्यालय नागभीड येथील सहा. शिक्षिका रजनी चिलबुले, प्रमुख अतिथी सुवर्णा टिपले, ग्रामीण रुग्नालयाच्या राजगडकर, परिचारिका खामनकर, महालॅब टीम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रक्तपेढी प्रमुख पवार यांची उपस्थिती होती.

.    ग्रामीण रुग्णालय नागभीड च्यावतीने सिकलसेल, बी.पी. व शुगर, एच.एल.एल. ची तपासनी करण्यात आली. या शिबिरात मनोज तवाडे व संदीप धोंगडे यांनी सहकार्य केले. या शिबिरात 90 महिलांच्या रक्त नमुन्यांची तपासनी करण्यात आली. रक्तदान शिबिरात सायली कावडकर, उज्वला गिरीपुंजे, प्रीती वानखेडे इत्यादी महिलांनी रक्तदान केले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन मोनिता फटिंग, प्रास्ताविक प्रिया लांबट यांनी केले तर आभार  पौर्णिमा टिपले यांनी मानले.