खुटाळा येथे ग्रामपंचायत कार्यालयात महिला दिन साजरा

36

नेरी : नेरी जवळील खुटाळा येथे जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात महिला दिन उत्साहात साजरा करतात आला.

.        या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रज्ञा राजूरवाडे तर विषेश अतिथी म्हणून दिक्षा पाटील सरपंच लोहारा, मृणाली बोरकर सरपंच खुंटाळा, सविता ननावरे पोलीस पाटील हरणी, लता रामटेके, पुष्पा बारसागडे, रेखा गावंडे, उषा गावंडे, माधुरी बारसागडे ग्रा प सदस्या आदि मान्यवर म्हणून उपस्थित होत्या. सर्वप्रथम महान विभूती च्या प्रतिमेचे पूजन करून सर्व पाहुणे मंडळींचा स्वागत सत्कार करण्यात आले यावेळी सर्वच मान्यवरांनी महिला दिनानिमित्त महिलांना मार्गदर्शन केले यावेळी महिला सक्षमीकरण महिलांची शैक्षणिक समस्या महिलांनी समाजात घेतलेली उंच भरारी यावर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका आशा वर्कर ग्रामसंघाच्या महिला तसेच गावातील सर्व महिला उपस्थित होत्या.