ज्ञानगंगा नित्यानंद आश्रमात महाशिवरात्री उत्सव साजरा

52

गडचांदूर : ज्ञानगंगा नित्यानंद आश्रम सेवा तथा गोपालन केंद्र कोलांडी नंदप्पा संस्थेच्या माध्यमातून महाशिवरात्री पर्वावर ध्यान साधना आणि यात्रा महोत्सवाचा कार्यक्रम संपन्न झाला.

.        दालमिया सिमेंट नारांडा चे लिंगेश्वर रेड्डी यांच्या हस्ते कलश पूजन व भवानी मातेच्या मंदिराला कलश चढविण्यात आला यावेळी तेलंगाना, नांदेड, लातूर, वणी, चंद्रपूर, राजुरा, कोरपना, गडचांदूर, जिवती परिसरातील साधकांनी सामूहिक ध्यान व महासत्संगाच्या कार्यक्रमासाठी 1400 ते 1500 साधक भक्तानी शिव ध्यान आणि महा सत्संगाचा लाभ घेतला तसेच रात्री बारा वाजे पासून अखंड शिव मंत्राचा जप सकाळी 10वाजेपर्यंत संपन्न झाला दुसऱ्या दिवशी सकाळी शिव पारायण, शिव लिंगाचा अभिषेक, हवन पूजन, तसेच महाशिवरात्री महोत्सव दर्शन सोहळा सुरू झाला.

.        या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ अनिल चिताडे, स्मिता अनिल चिताडे दिलीप झाडे, डॉ. किसन भोयर, महेश देवकते, पी एस कोकाटे, प्रफुल मालेकार, गणेश कदम, माजी आमदार अँड वामनराव चटप, डॉ. जयदेव चटप, डॉ. प्रफुल गोवादिपे, प्रशांत गोखरे, किशोरी प्रशांत गोखरें, महादेव हेपट, यांचा संस्थे तर्फे सत्कार करण्यात आला. महिला दिनाचे औचित्य साधून नंदा देवाळकर, किशोरी गोखरे यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. दिनकर चौधरी व त्यांचे सहकारी कावठाला तेलंगाना विभाग अप्पा देवकते व त्यांचे सहकारी नांदेड विभाग संजय शिंदे, प्रफुल गोवारदिपे,दौलत मडावी, कोडापे आणि मंदा वडस्कर व सर्व गडचादुर येथील महिला सहकारी सेविकांच्या संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच प्रशांत गोखरे परिवारातर्फे गरीब महिलांना वस्त्रदान करण्यात आले. तसेच महाशिवरात्रीच्या यात्रा महोत्सवात जिवती तालुक्यातील व परिसरातील दोन ते अडीच हजार भाविक भक्तांनी दर्शन घेऊन या कार्यक्रमाचा लाभ घेतला. तसेच भक्तांना महाप्रसाद व रताळ प्रसाद वितरण करण्यात आला. सायंकाळी सहा वाजेपर्यंत महाशिवरात्री यात्रा महोत्सव संपन्न झाला तसेच या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सर्व सेवाकऱ्यांनी सहकार्य केले.