वासेरा ग्रा. पंचायत ने लावली कचऱ्याची विल्हेवाट

49

घंटा गाडीच्या माध्यमातून कचऱ्याचे होत आहे संकलन

सिंदेवाही : बदलते तंत्रज्ञान, वाढती स्पर्धा, अनेक क्षेत्रात केले जाणारे संशोधन या गोष्टींमुळे देश नव्या यशाच्या पायऱ्या चढत असला, तरी, आताच्या काळात एका मोठ्या समस्येने सगळेच नागरिक हैराण आहेत. आणि ती समस्या म्हणजे कचरा. वासेरा ग्राम पंचायत कडून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी नुकतीच एक सौर ऊर्जेवरील घंटागाडी घेण्यात आली असून आता दररोज गावात घंटागाडी फिरवून कचरा संकलन करण्यात येत असल्याने गाव आता स्वच्छ आणि सुंदर करण्यात येत असल्याचे बोलल्या जात आहे.

.      मुळात निसर्गात कोणताच कचरा नसतो. कचरा हा आपणच करत असतो. निसर्गाकडून जे मिळतं ते परत आपण निसर्गाला द्यावं हे अपेक्षित असते. परंतु ते होत नाही आणि त्यातुन कचरा हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. आपण आपले घर स्वच्छ ठेवतो पण बाहेरचा परिसर स्वच्छ ठेवायचा आपल्याला विसर पडतो. पर्यायाने गावात ठीकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे पसरून गावात अस्वच्छता निर्माण होत असतो. ग्राम पंचायत कार्यालय वासेरा यांनी गावातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी १५ वा वित्त आयोग या निधी अंतर्गत नुकतीच एक सौर ऊर्जेवरील घंटागाडी खरेदी केली. आणि त्या माध्यमातून गावातील कचरा संकलन करण्याचे काम ग्राम पंचायती मार्फत सुरू असल्याने गावातील नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले असून लवकरच ओला कचरा, आणि सुखा कचरा याचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्राम पंचायती मार्फत बादल्या खरेदी करण्याचा मानस सरपंच महेश बोरकर यांनी व्यक्त केला आहे.