भाजपा जनसंपर्क कार्यालयात नागरिकांना विविध योजनाचे कार्ड वाटप

33

वरोरा : येथील भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय वरोरा च्या वतीने डॉ. सागर वझे यांच्या संकल्पनेतून मोहल्ला ई सेवा केंद्रातर्फे प्रभागनिहाय काढण्यात आलेले आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड, ई-श्रम कार्ड यांचे वाटप करण्यात आले आहे. यासोबतच बेटी बचाव, बेटी पढाओ व पर्यावरण संवधर्न या विषयावर आधारित रांगोळी स्पर्धचे बक्षीस वितरण तथा जागतिक महिला दिनानिमित्त श्वेता देवतळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

.         या कार्यक्रमात नुकत्याच पार पडलेल्या रांगोळी स्पर्धेचे १२ प्रभागात प्रथम, द्वितीय तथा तृतीय रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. हा कार्यक्रम हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रमेश राजूरकर उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून भगवान गायकवाड, सुरेश महाजन, शुभांगी निंबाळकर, सायरा शेख तथा डॉ. विनायक वझे मेमोरियल ट्रस्ट अंतर्गत विशेष उपस्थिती म्हणून रोहिणी देवतळे, सुनिता काकडे, किर्ती कातोरे, राजु गायकवाड, अहेतेशाम अली, वामन तूर्के, करण देवतळे हे प्रामुख्याने उपस्थीत होते.

.      या कार्यक्रमासाठी वरोरा शहरातील लाभार्थी नागरिक तथा भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय तर्फे घेण्यात आलेल्या या निःशुल्क सेवा शिबिरासाठी मार्गदर्शन करतांना हंसराज अहिर यांनी डॉ. सागर वझे व त्यांच्या संपूर्ण चमुचे अभिनंदन केले तसेच ही निःशुल्क सेवाभावी कार्य वरोरा शहरात अविरत चालू राहील अशी ग्वाही रमेश राजूरकर यांनी दिली. या कार्यक्रम मध्ये प्रकाश श्रवण बोंडे आयुष्यमान कार्ड चे लाभार्थी यांना १० दिवसा आधी हृदयविकाराचा झटका आला असता त्यांना चंद्रपूर येथे नेले तेव्हा त्यांना ३ लाख खर्च सांगितला गेला होता पण त्यांच्या कडे आयुष्यमान कार्ड असल्यामुळे त्यांना निःशुल्क हृदयविकार सेवा नागपूर येथील शुअरटेक हॉस्पिटल इथे चालू आहे असे भावूक उदगार त्यांचे भाचे नंदकिशोर विधाते यांनी व्यासपीठावर व्यक्त केली. या कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. सागर वझे यांनी मांडली व सूत्र संचालन मंगला डांगरे यांनी यशस्वी रित्या पार पडले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुनिता काकडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यास महेश श्रीरंग, संजू राम,अभय मडावी, पंकज जाधव, अरुण मोदी, दिपक घुडे, राहुल बंदुरकर आणि जगदीश तोटावर यांनी सहकार्य केले.