बांधकाम कामगार नोंदणीच्या नावावर नागरिकांची आर्थिक लूट

47
  • पाचशे ते आठशे रुपये वसुली
  • बोगस कामगारांच्या नोंदणीत वाढ
  • खरा कामगार वंचित

पंकज रणदिवे

    नेरी : आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांची परिस्थिती सुधारावी, यासाठी सरकार विविध योजना राबवते. त्यानुसार मजुरांना मोफत साहित्याचे वाटप केले जाते; मात्र त्यांना साहित्य मिळवून देण्याचे भासवून जिल्ह्यातील एजंट त्यांच्याकडून पाचशे ते आठशे रुपये गोळा करत कामगारांची लूट करत असुन पैश्यासाठी अनेक बोगस कामगार दाखवत असल्याचा गोरखधंदा चंद्रपूर जिल्हात होत असल्याचा प्रकार समोर येत आहे.

.       महाराष्ट्र इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचे वतीने कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबविण्यात येते. यात इमारत बांधकाम किंवा इतर बांधकाम तसेच त्यासंबंधातील 53 प्रकारच्या कामगारांची नोंदणी केल्या जाते. काही दिवसांपूर्वीच बांधकाम कामगाांसाठी किचन व उपयोगी साहित्य वाटप होणार अशी माहिती नागरिकांत वाऱ्यासारखी पसरली व त्यामुळें जे कधी काम नाही केले ते सुद्धा नोंदणी करण्यासाठी प्रयत्न करत होते त्याचाच फायदा घेत चिमूर तालुक्यांत काहीं एजंटनी सामान्य भोळ्या भाभळ्या लोकांचा गैरफायदा घेत त्यांच्याकडून 500 ते 1000 रूपये घेऊन बोगस नोंदणी करून देत असल्याची नागरिकांत चर्चा आहे. मात्र प्रशासन याबाबत गाढ झोपेत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

.       कामगार नोंदणी करण्यासाठी त्यासंबंधित कामात किमान 90 दिवस काम करणे गरजेचे असतानाही काम करणारे व काम न करणारे सुद्धा आपले नोंदणी करण्याकरिता धडपड करताना दिसत आहे. त्यामुळे नोंदणी करणारे एजेंट सुद्धा पाहावयास मिळत असून कोणतीही कागदपत्रांची तपासणी न करता बिनधास्त बोगस नोंदणी होत असल्याचे नागरिक सांगताना पाहावयास मिळत आहे. यामुळे मुळ कामगार या योजनांपासून दूर राहण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शासनाच्या महत्वकांक्षी योजनेचा तूर्तास फज्जा उडत असल्याचे दिसून येत असून प्रशासनाने तात्काळ पाऊल उचलून बोगस नोंदणी थांबवावी व बोगस कामगारांची नोंदणी करणाऱ्या व अव्वाचे सव्वा पैसे उखळनाऱ्या एजंट वर कारवाही करून अवैध रित्या होत असलेली लूट थांबवावी अशी मागणी नागरिक करीत आहे.