जागतिक महिला दिनानिमित्त शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय शिवालय येथे ११ मार्च ला विविध कार्यक्रमांचे आयोजन

32
  • शिवसेना विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे यांचा पुढाकार

वरोरा : जागतिक महिला दिन 8 मार्च साजरा करण्यात येतो, या दिनी महिलांनी आपल्या हक्कासाठी लढा दिला व त्यामध्ये यश मिळविले. या वर्षीच्या जागतिक महिला दिनाचा उद्धेश हा महिलांना विविध क्षेत्रात कार्य करण्यासाठी प्रेरित करणे व त्यांना प्रेरणा देने हा असून या वर्षी जागतिक महिला दिन शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय शिवालय येथे ११ मार्च ला  साजरा करण्यात येत आहे.

.       त्याच अनुषंगाने जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने शिवसेना विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्या पुढाकाराने दि.११ मार्च २०२४ ला शिवसेना (उबाठा) महिला आघाडीच्या वतीने शिवसेना पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय शिवालय येथे महिलांकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

.       सदर कार्यक्रमाची सुरुवात शिवालय येथील माता भवानीची पूजा व आरती करून करण्यात येणार असून त्यानंतर दिवसभर विविध कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये संगीत खुर्ची कार्यक्रम, आहार प्रदर्शनी कार्यक्रम, कला प्रदर्शनी, महिलांची पथनाट्य, महिलांचे प्रबोधनात्मक नृत्य अशा प्रकारचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

.       या कार्यक्रमाकरिता राज्य महिला आयोगाच्या सदस्या संगीता चव्हाण, चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख महिला आघाडी सुष्मा साबळे, चंद्रपूर जिल्हा संघटिका नर्मदा बोरेकर, विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे, उपजिल्हा प्रमुख भास्कर ताजने, तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, भद्रावती तालुका प्रमुख नंदु पढाल, युवा सेना जिल्हा प्रमुख रोहन कुटेमाटे, जिल्हा युवती अधिकारी प्रतिभा मांडवकर, व इतर पदाधिकारी हे उपस्थित राहणार असून त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहेत.

.       सदर कार्यक्रमाचे नियोजन संपूर्ण महिला आघाडीच्या पदाधिकारी जिल्हा संघटिका नर्मदा बोरेकर, उपजिल्हा संघटिका माया नारळे, जिल्हा युवती अधिकारी प्रतिभा मांडवकर, वरोरा तालुका संघटिका सरला मालोकर, भद्रावती तालुका संघटिका आशा ताजने, वरोरा शहर संघटिका शुभांगी अहिरकर, भद्रावती शहर संघटिका माया टेकाम व इतर पदाधिकारी यांनी केले असून वरोरा -भद्रावती विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे, उपजिल्हा प्रमुख तथा सभापती भद्रावती कृषि उत्पन्न बाजार समिती भास्कर ताजने, युवा सेना जिल्हा प्रमुख रोहन कुटेमाटे, तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, भद्रावती तालुका प्रमुख नंदु पढाल, वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकार, भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले व इतर सर्व पदाधिकारी तसेच महिला आघाडी, युवासेना, युवतीसेनेच्या सर्व पदाधिकारी यांनी सर्व महिलांनी सदर कार्यक्रमाकरिता उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.