नवीन प्रशासकीय इमारतीमुळे नागरिक व अधिकाऱ्यांच्या गैरसोयीला पूर्णविराम : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

25
  • ब्रम्हपूरी येथे १२ कोटी रुपयांच्या पं. स. इमारत बांधकामाचे भुमीपुजन
  • शहराच्या सौंदर्यात भर

चंद्रपुर : त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेत जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्या मधील महत्वाचा दुवा पंचायत समिती आहे. याठिकाणी ग्रामीण भागातील नागरिक आपल्या विविध कामांसाठी येत असतात. त्यामुळे ही इमारत प्रशस्त असावी म्हणून आपण ही इमारत मंजूर केली आहे. ब्रम्हपूरी शहरात विविध शासकीय विभागाच्या प्रशस्त इमारती तयार झाल्या असून या इमारती शहराच्या सौंदर्यात भर घालत आहेत असे प्रतिपादन राज्याचे विरोधीपक्षनेता तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

.      ब्रम्हपूरी येथे १२ कोटी रुपयांच्या निधीतून बांधण्यात येणाऱ्या पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाच्या भुमीपुजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.

.      यावेळी माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, शहर काँग्रेसचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती विलास विखार, माजी जि.प.सदस्या स्मिताताई पारधी, माजी पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मोंटु पिलारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, माजी पं.स.सभापती नेताजी मेश्राम, महीला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगलाताई लोनबले, बाजार समितीच्या उपसभापती सुनीता तिडके, बाजार समितीचे संचालक प्रमोद मोटघरे, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष नामदेव लांजेवार, बाजार समितीचे संचालक उमेश धोटे, बाजार समितीचे संचालक किशोर राऊत, बाजार समितीचे संचालक प्रेमानंद मेश्राम, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अमित कन्नाके, माजी नगरसेवक जगदीश आमले, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सहसचिव प्रा.डि के मेश्राम, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, चंद्रशेखर गणवीर, रेश्मा लाखानी, सुधा राऊत, रश्मी पगाडे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

.      ब्रम्हपूरी तहसील कार्यालयाची इमारत जेवढी देखणी तयार केली आहे. अगदी तशीच इमारत पंचायत समितीची देखील असणार आहे. ब्रम्हपूरी शहरातील विविध चौकांच्या सौंदर्यीकरणाचे काम लवकरच सुरू होत आहे. मागील दहा वर्षांपासून आपण मोठ्या प्रमाणात विकासकामा़ंसाठी निधी खेचून आणला आहे. शहरात न्यायालयाची इमारत, उपजिल्हा रुग्णालयाची इमारत, क्रीडा संकुल, ई लायब्ररी, बांधकाम विभागाचे कार्यालय व विश्रामगृहाची इमारत, जलतरण तलाव, नगरपरिषदेची इमारत ह्या सर्व इमारती आम्ही विशेष प्रयत्न करून मंजूर केल्या. त्या मोठ्या डौलाने उभ्या आहेत.