नागभीड येथे श्याम मानव यांचे व्याख्यान

27

नागभीड : आम्ही भारतीय लोक नागभीड च्या वतीने ‘भारतीय लोकशाही पुढील आव्हाने’ या विषयावर राजकीय विश्लेषक व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रा. श्याम मानव यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आज दिनांक 7 मार्च 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता रुख्मिणी लॉन नागभीड येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

.         या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष ऍड. गोविंद भेंडारकर आहेत तर स्वागताध्यक्ष प्रदेश संघटक ओबीसी विभाग हे असून डॉ. मनोहर टेम्भूरकर तळोधी, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा सचिव अनिल लोनबले यांची उपस्थिती असणार आहे.

.         सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अखिल भारतीय ओबीसी संघटना, महिला बचत गट नागभीड, वंचित बहुजन आघाडी नागभीड, अधिवक्ता संघटना, विकास शिक्षण संस्था नागभीड, लोकनेते बाबुराव भेंडारकर सार्वजनिक वाचनालय नागभीड, पत्रकार संघटना नागभीड यांनी केले आहे.