सावरगाव येथील प्राथमिक शाळेत सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण

25

नागभीड : तालुक्यातील सावरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव समिती तर्फे सावरगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता 3  व 4 च्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मंगळवारी (दि.5 मार्च) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत पार पडला.

.       या बक्षीस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र हटवार होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रा. पं. सदस्य युवराज रामटेके, तळोधी पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश बारसागडे, सामाजिक कार्यकर्ते गिरीधर निकुरे, सहायक शिक्षिका वैशाली पालांदूरकर, सुरक्षा कोलप्याकवार, सहायक शिक्षक राजू शेंडे, अरुण कुंभले, माधव बोरकर यांची उपस्थिती होती.

.       यावेळी सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्रतीक्षा दिलीप निकुरे हिने मिळविले, द्वितीय पुरस्कार पूर्वी अमृत बोरकर व कनिष्का सुनील बन्सोड यांनी मिळविले तर तृतीय पुरस्कार वंचिता दिवाकर नेवारे या विद्यार्थिनीने मिळविला. या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते  पारितोषिक वितरण करण्यात आले.या कार्यक्रमाचे संचालन अरुण कुंभरे यांनी केले तर आभार राजू शेंडे यांनी मानले.