अवैद्यरित्या वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले

21
  • महसूल विभागाची कारवाही
  • महसूल विभाग अॅक्शन मोड वर

वरोरा : चंद्रपुर जिल्ह्यात अजूनही रेती घाटांचे लिलाव झाले नाही. त्यामुळे अवैद्य रेती माफियांनी रेतीची तस्करी करणे सुरू केले. मात्र मागील काही दिवसापासून या रेती तस्करांविरुद्ध महसूल विभागाकडून कारवाहीचा बडगा पुकारल्याने अवैद्य रेती तस्करांचे चांगलेच धाबे दणानले आहे. असे असतांनाही ग्रामीण भागात रेती तस्कर रेतीची तस्करी करत असल्याने वरोर्‍याचे तहसिलदार अवैद्य उत्खनन तपासणी करिता  वरोरा दौऱ्यावर असतांना मौजा – जामगाव बु. व मौजा चिकणी या दोन्ही गावात अवैद्य रित्या रेती वाहतूक करणार्‍या दोन्ही ट्रॅक्टर वर कारवाही करून तहसील कार्यालय वरोरा येथे जप्ती करण्यात आली.

.        प्राप्त माहिती नुसार वरोर्‍याचे तहसिलदार योगेश कौटकर हे अवैद्य उत्खनन तपासणी करिता  वरोरा दौऱ्यावर होते. दि 4 मार्च रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास मौजा – जामगाव बु. गावाच्या परिसरात ट्रॅक्टर – MH- 40 A-571 या वाहनातून 100 घनफुट ( 1 ब्रास) रेती गौण खनिज वाहतूक करीत असतांना आढळुन आल्याने उक्त वाहन तहसील कार्यालय, वरोरा येथे जमा करण्यात येऊन सदर वाहनाचा जप्तीनामा करण्यात आला. सदर जप्तीनाम्यावरुन सदर वाहन संजय मंगल वाघमारे रा. वरोरा ता. वरोरा जि. चंद्रपूर यांचे असल्याचे नमूद आहे. तर दि  6 मार्च रोजी अवैध उत्खनन तपासणी करीता नायब तहसीलदार उल्हास लोखंडे वरोरा दौऱ्यावर असतांना सकाळी 11 वाजताच्या सुमारास मौजा – चिकणी गावाच्या परिसरात ट्रॅक्टर – MH- 34 AP-1729 या वाहनातून 100 घनफुट ( 1 ब्रास) मुरुम गौण खनिज वाहतूक करीत असतांना आढळुन आल्याने उक्त वाहन तहसील कार्यालय, वरोरा येथे जमा  करण्यात येऊन सदर वाहनाचा जप्तीनामा करण्यात आला. सदर जप्तीनाम्यावरुन सदर वाहन प्रशांत केळकर, रा. बेलगाव ता. वरोरा जि. चंद्रपूर यांचे असल्याचे नमूद आहे. या दोन्ही कारवायाने रेती तस्करांचे धाबे दणानले असले तरी कारवाहिला न घाबरता ग्रामीण भागात मात्र रेती तस्करीचा प्रकार राजरोसपने सुरूच असल्याचे समजते.