पर्यायी ऊर्जा स्‍त्रोत देशाची गरज

396
  •  तज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत अल्‍टरनेटीव्‍ह एनर्जी सोर्सेस’ वर चर्चा

चंद्रपूर : देशाची उर्जेची वाढती मागणी, प्रदूषण अशा अनेक कारणांमुळे सौर ऊर्जा, कोल गॅसिफिकेशन सारख्‍या पर्यायी ऊर्जा स्‍त्रोतांची गरज निर्माण झाली असल्‍याचा सूर चर्चासत्रात उमटला.

.        महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा प्रशासन, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन, चंद्रपूर व असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘ॲडव्हांटेज चंद्रपूर 2024 – इंडस्ट्रियल एक्स्पो अँड बिझनेस कॉन्क्लेव्ह’ च्‍या उद्घाटन सोहळ्यानंतर वन अकादमी येथील विद्युत हॉलमध्‍ये ‘अल्‍टरनेटीव्‍ह एनर्जी सोर्सेस’ विषयावर चर्चासत्र पार पडले.

.        या सत्राचे संयोजन मनपा आयुक्‍त विपिन पालिवाल यांनी केले. असोसिएशन फॉर इंडस्‍ट्रीयल डेव्‍हलपमेंट अध्‍यक्ष गिरधारी मंत्री, न्‍यू ईरा क्लिनटेकचे व्‍यवस्‍थापकीय संचालक बाळासाहेब दराडे, सौर ऊर्जा अभ्‍यासक सुधीर बुधे, तज्ज्ञ गोपाल डेकाते यांनी सहभाग नोंदवला.

.        नैसर्गिक वायू, तेल आदींच्‍या कमतरतेमुळे कोल गॅसिफिकेशनचा पर्याय समोर आला असून त्‍याद्वारे कार्बन डायऑक्‍साईड, हायड्रोजन, मिथेनॉल प्राप्‍त करता येऊ शकतो. कोल गॅसिफिकेशनसारख्‍या नाविन्‍यपूर्ण प्रयत्‍नाशिवाय देश आत्‍मनिर्भर होऊ शकत नाही, असे मत बाळासाहेब दराडे यांनी व्‍यक्‍त केले. सुधीर बुधे यांनी सौर उर्जेसंदर्भात मार्गदर्शन केले. सौर उर्जेत देशाची वाढती ऊर्जेची मागणी पूर्ण करता येऊ शकते. सौर ऊर्जेमुळे पर्यावरणाचे संरक्षण, ट्रान्‍समिशन लॉसेस कमी होणे, निरुपयोगी जागेचा वापर, विजेचे दर यामध्‍ये ग्राहकाला लाभ मिळेल, असे सांगितले.

.        गिरधारी मंत्री यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक कोटी घरांवर सौर पॅनेल लावण्‍याची योजना आखली असून त्‍या माध्‍यमातून युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो, असे सांगितले. विविध अभ्‍यासक्रमांची गरज यावेळी उपस्‍थि‍त मान्‍यवरांची सांगितली. यानंतर झालेल्‍या पॅनेल डिस्‍कशनचे संचालन प्राचार्य प्रविण पोटदुखे यांनी केले. यात चंद्रपूरातील शाळा, बगिचे, रस्‍त्‍यांवर सौर दिवे लावून मनपाला येणारे विजेचे बिल 50 टक्‍क्‍यांनी कमी करण्‍याचा मानस पालिवाल यांनी व्‍यक्‍त केला. उपस्‍थ‍ित तज्ज्ञांनी  श्रोत्‍यांच्‍या शंकांचे निरसन केले. या सत्राचे सूत्रसंचालन श्‍यामल देशमुख यांनी केले.

आर्यन अँड स्‍टील’ ‘मायनिंग अँड कोल’ वर झाला संवाद : प्रभा हॉलमध्‍ये जिल्‍हा खनिज अधिकारी सुरेश नैताम यांच्‍या संयोजनात आर्यन अँड स्‍टील’ विषयावर चर्चासत्र पार पडले. यात जिंदल स्टिल अँड पॉवरचे लिमिटेडचे अध्‍यक्ष हरविंदर सिंगजिऑलॉजी अँड मायनिंग चे महाव्‍यवस्‍थापक डॉ. मनोज साहूटाटा स्‍टीलचे सागर जैन यांचा सहभाग होता. मायनिंग अँड कोल’ या चर्चासत्रात सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मायनिंगचे राजेश रेहलानऑरो नॅचरल रिसोर्सेसचे संजय मिश्राआरोबिंदो रिअॅलिटीचे व्‍ही.बी. सिंग व डब्‍ल्‍यूसीएलचे राकेश प्रसाद यांचा सहभाग होता.