असंख्य गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत तपोभूमी गुंफा गोंदेडा ची आमसभा पार पडली

26

नेरी : चिमूर तालुक्यातील नेरी जवळील विदर्भातील पंढरी समजली जाणारी आणि राष्ट्रसंताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमी गुंफा गोंदेडा येथे दि 3 मार्चला विविध विषयांवर आणि गुंफा यात्रा महोत्सव वर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी अनेक गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत आमसभा उत्साहात पार पडली.

.       सदर आमसभा ही गुंफा यात्रा महोत्सव समितीचे अध्यक्ष मिथुन गुरनुले व गुंफा साधनाश्रम समितीचे अध्यक्ष विठ्ठल सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सदर सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन करण्यात आले तसेच गुंफा यात्रा महोत्सवाला आलेल्या खर्चाचे तपशीलवार माहिती देण्यात आली तसेच तपोभूमीवर झालेल्या बांधकामा ची माहिती देण्यात आली तसेच मागील वर्षी झालेल्या कार्यक्रमाची माहिती देऊन तपशील सांगण्यात आला यानंतर जानेवारी मध्ये झालेल्या तपोभूमी गुंफा यात्रा महोत्सव चा खर्चाचा हिशोब सादर करून सर्वानुमते मंजूर करण्यात आला यानंतर पुढील कार्याची रुपरेषा ठरवून वर्षभर होणाऱ्या कार्यक्रमाचे नियोजन ठरविण्यात आले तसेच महाराजांच्या कार्याची प्रचार आणि प्रसार यावर सुद्धा चर्चा करण्यात आली.

.       यावेळी व्यासपीठावर धनराज मेश्राम, आनंदराव दडमल, आनंदराव गणोरकर, दामोदर दडमल, गिरजाबाई गायकवाड, सरपंच प्रवीण वाघे, पांडुरंग अडसोडे, चंद्रभान शेंडे सचिव आदी सह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सभेचे संचालन प्रा भास्कर वाढई यांनी केले या सभेला अनेक गुरुदेव भक्त भाविक तसेच गावकरी मंडळींनी हजेरी लावली होती.