नेरी येथे संत गजानन महाराज प्रकट दिन साजरा

27

आ. बंटी भांगडीया यांची प्रमुख उपस्थिती

नेरी : नेरी येथील फडणवीस ले आउट मधील संत श्री गजानन महाराज यांच्या मंदिरामध्ये दोन दिवसीय प्रगट दिन विविध कार्यक्रमाच्या आयोजनाने संपन्न करण्यात आला या कार्यक्रमाला चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीयानी उपस्थिती राहून भक्तगणनाना तसेच नागरिकांना मार्गदर्शन केले.

.          संत गजानन महाराज प्रगट दिन कार्यक्रमाची सुरुवात दि 2 मार्चला घटस्थापना पंडित नंदू गायकी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली यानंतर भजन पूजन व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले दि 3 मार्चला सकाळी मंदिर परिसर स्वच्छ करून विधिवत पूजा करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली भजन करून मार्गदर्शन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. यावेळी आमदार भांगडिया यांचा फडणवीस ले आऊट च्या नागरिकांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी मार्गदर्शन करताना भांगडिया यांनी 20 लाख रुपयांचा निधी या परिसराच्या विकासासाठी मंजूर करण्यात येईल असे आश्वासन दिले तसेच अनेक योजना वर माहिती देऊन महाराजांचे भक्ती भावाने पूजन करून दर्शन घेतले यावेळी अनेक महिलांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

.          यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजू झाडे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. श्याम हटवादे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा ज्येष्ठ नेते विलास डांगे, भाजपा ज्येष्ठ नेते रमेश कंचर्लावार, संजय गांधी निराधार समिती चिमूर अध्यक्ष संजय नवघडे, भाजपा नेते अर्जुन थुटे, भाजपा जि.प. सर्कल प्रमुख संदीप पिसे, भाजपा सिरपूर पं. स. सर्कल प्रमुख विलास कोराम,, संजय बुटले, रमेश पिसे, राजू पंधरे, अशोक मगरे, आशिष कामडी, नथ्थुजी खाटीक, महेश गभणे, नरेश मेश्राम, अरुण डुकरे, रामभाऊ गभणे, सदानंद घरत, जोगेश्वर धाबेकर व अन्य मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.