आमदार कीर्तिकुमार भांगडीया यांचा संताजी तेली समाजाकडून सत्कार

29

नागभीड : आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या अथक प्रयत्नाने व सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नागभीड नगर परिषद क्षेत्रात संत जगनाडे महाराज यांचे सोयी सुविधायुक्त सार्वजनिक सभागृह बांधकामासाठी ६ कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून देत प्रशासकीय मान्यता मिळाल्याबद्दल आमदार बंटी भांगडिया यांची नागभीड येथील जनसंपर्क कार्यालयात तेली समाजबांधवांनी भेट घेतली. याप्रसंगी श्री संताजी तेली समाज तालुका नागभीड च्या वतीने आमदार बंटी भांगडिया यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

.        यावेळी प्रामुख्याने गणेश तर्वेकर, अनिल लांबट, हरिश्चंद्र मेहर, मनिराम सहारे, सुधीर गिरडे, दौलत समर्थ, घनश्याम समर्थ, विनायक चिलबुले, गंगाधर आकरे, बालू तर्वेकर, उपासराव सातपैसे, महेश ठाकरे, दादाजी कुर्जेकर, प्रभाकर सुकारे, वाघे, बंडू क्षीरसागर, रमेश ठाकरे, संजय अमृतकर, धनराज काटेखाये, प्रफुल लांबट, पिंटू कूर्जेकर, भूपेश चिलबुले, कुणाल सहारे, दिवाकर ठाकरे, सिताराम बावनकर , शुभम येरणे, देवा बावनकर, लांजेवार , , प्रिया लांबट, उर्मिला अमृतकर व अन्य तेली समाजबांधव, पदाधिकारी तथा कार्यकर्ते बहुसंख्खेनी उपस्थित होते.