शेगावच्या ठाणेदाराची ३६ दिवसातच नागभीड येथे बदली

43
  • पदभार स्विकारताच अवैध धंदा वर सपाटा 
  • पोलीस पाटील व नागरिकांत नाराजीचा सूर 

वरोरा : अवघ्या दीड महिन्यापूर्वी बल्लारपुर पोलीस स्टेशन येथून सहाय्यक पोलिस निरीक्षक ठाकरे यांची वरोरा तालुक्यातील शेगाव बू येथे बदली झाली. त्यांनी ठाणेदार पदाचा पदभार स्विकारत अल्पावधीतच त्यांनी  अवैद्य धंदयावर कारवाहीचा बडगा पुकारत अनेकांची मने जिंकली. मात्र कर्तव्यदक्ष अशा ठाणेदाराची अचानक नागभीड येथे बदली झाल्याने पोलीस पाटील व नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.

.      पोलीस स्टेशन शेगाव बू हद्दीत एकूण १०२ गावे आहे.  या पोलिस स्टेशन चा कारभार तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश मेश्राम सांभाळत असताना त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवित आपली ओळख निर्माण केली होती. त्यांची मूल येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर बल्लारपुर पोलिस स्टेशन येथून सहाय्यक पोलिस निरीक्षक ठाकरे यांनी शेगांव पोलिस स्टेशन चे  ठाणेदार म्हणून पदभार स्विकारला. पदभार स्विकारताच अवैध धंदे, गुन्हेगारी यावर ताबा मिळवीत कायदा व सुव्यवस्था सांभाळल्याने ठाकरे यांनी महिनाभरातच गावकऱ्यांच्या मनात खरे उतरले. ठाकरे यांनी बल्लारपुर येथे असताना  कलम 302 या प्रकरणातील तपासामध्ये सदर आरोपींना आजीवन कारावासाची शिक्षेसाठी दोषारोष सादर केले. व त्या आरोपीला आजीवन कारावासाची शिक्षा झाली. यासह  त्यांनी आजपर्यंत कुठल्याही गुन्हेगाराची हयगय केली नाही. त्यांचे नाव कानी पडताच अनेक गुन्हेगारांची धाबे दणानत होते. त्यांची शेगांव पोलिस ठाण्यात बदली होताच पोलिस स्टेशन हद्दीतील पोलिस पाटलांना भेटी देत गावांतील माहिती जाणून घेतली.

.      सामाजिक उपक्रम राबविणे सुरू केले. दररोज नवनवीन गुन्ह्यांचा शोध घेऊन त्यावर चांगलीच जरब बसविण्याचे काम करताना दिसत आहे. पोलीस स्टेशन शेगाव बू हद्दीतील सट्टापट्टी, अवैध दारुविक्री, रेती तस्करी, अवैध वाहतूक करण्यांवर धाडी टाकून त्यांचा चांगलाच बंदोबस्त करण्यात ते व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे धाबे दनाणले असून यातून परिसरात शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित होण्यास मदत होत आहे. कामाचा सपाटा सुरु असतानाच पोलीस स्टेशन शेगाव बू येथून अवघ्या ३६ दिवसात ठाणेदार ठाकरे यांची बदली नागभीड पोलीस स्टेशन येथे करण्यात आल्याने परिसरातील लोकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. तसेंच पोलीस पाटीलसुद्धा त्यांचे बदलीमुळे नाराजी व्यक्त करीत आहे.