नागभीड शहरात महाशिवरात्री उत्सवाच्या निमित्याने होणार बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन.

39

आ. बंटी भांगडिया यांचा पुढाकार

15 ते 18 मार्च पर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल

नागभीड : नागभीड येथील महाशिवरात्री यात्रेला 400 वर्षे जुनी परंपरा असून नागभीड येथील शासन प्रशासन सज्ज झालेले आहे. दरवर्षी प्रमाणे महाशिवरात्रीला पूर्ण विदर्भातून या ठिकाणी भाविक भोलेनाथाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. आमदार बंटी भांगडिया यांनी पुढाकार घेत 8 मार्च रोजी येणाऱ्या भाविकासाठी साबुदाणा खिचडी वितरणाची सोय केलेली आहे. तसेच टेकडी कडे महाशिवरात्री झाल्यावर दोन गुरुवार बाजार भरण्याची अनेक वर्षाची परंपरा आहे.

.         त्या निमित्ताने गुरुवार 14 मार्च रोजी भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दरवर्षी प्रमाने यंदाही मीना बाजाराचे आयोजन भव्य विद्युत रोषणाई सोबत करण्यात आले आहे. तसेच या महाशिवरात्री यात्रेला मोहोत्सवाचे स्वरूप यावे यासाठी आमदार बंटी भांगडिया स्वतः पुढाकार घेत असून यावर्षी सुद्धा अनेक दर्जेदार संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात 15 मार्च भव्य 300 कलावंत असलेला ‘गण गण गणात बोते’ या भक्ती नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.

.          या प्रसंगी उदघाटन कार्यक्रमाला आ. भांगडिया यांच्या समवेत सिने अभिनेत्री रेणुका शहाणे या उपस्थित राहणार आहेत. 16 मार्च भव्य प्रसिद्ध गायक मेरा भोला है भंडारी फेम हंसराज रघुवंशी यांचा भक्तीमय गीताचा कार्यक्रम आयोजित आहे. तर 17 मार्च रोजी सोनी मराठी वाहिनी वरील प्रसिध्द कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रा कॉमेडी शो आहे. यात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची उपस्थिती असणार आहे. तर 18 मार्च रोजी नॅशनल लेव्हल डान्स प्रतियोगितेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवटेकडीच्या पायथ्या पासून मॉर्निंग वाक संघटना निर्मित 51 फुटाच्या भगवान शंकराच्या मूर्ती पर्यंत भव्य गुफा साकारण्यात येत असून कोलकाता येतील 15 कुशल कारगीर अहोरात्र गेल्या 1 महिन्या पासून काम करीत आहेत. यात रामोजी फिल्म सिटी मधील एका कलाकारचा समावेश आहे. यात 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन भाविकांना होणार आहे.

.         या महाशिवरात्री उत्सवाचा सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन महाशिवरात्री उत्सव समिती तर्फे चिमूर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर,भाजपा तालुका प्रमुख संतोष रडके, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अवेश पठान, माजी बांधकाम सभापती सचिन आकुलवार,मार्निंग वाट संघटने चे अनिल लांबट, नथ्थूजी निमजे , गगांधर आकरे, व्यापारी मंडळाचे गुलजार धम्मानी,विजय बंडावार, अजय काबरा, व अन्य भाजपा पदाधिकारी यांनी केले आहे.