महसूल विभागा मार्फत वरोरा तालुक्यात महाराजस्व अभियान

19

वरोरा : महसूल विभागा मार्फत महाराजस्व अभियान अंतर्गत जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे निर्देशानुसार भटके व विमुक्त जातीतील लाभार्थी यांना शासन सेवा त्यांच्या गावात पुरविण्यासाठी वरोरा तालुक्यात महाराजस्व अभियान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

.     महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्याकरिता तसेच सर्वसामान्य जनता यांचे महसूल विभागा अंतर्गत येणारे कामे निकाली काढण्यासाठी महाराजस्व अभियानाचे आयोजन वरोरा तालुक्यातील मांडवगु-हाड, हिरापुर, पारधी टोला, येवती, कोसरसार, सुमठाना, येन्सा या गावात दिनांक 4 मार्चला घेण्यात येणार असून गाव पातळीवर लोकांना गावातच ही सेवा मिळवून देण्याच्या उद्देशाने भटके व विमुक्त जातीतील लाभार्थीना त्यांची कामे  गतिमान व्हावे व त्यांना त्यांच्या कार्याची पूर्तता व्हावी या उद्देशाने या अभियानाचे आयोजन करण्यात येत असून या अंतर्गत विविध विभागाच्या शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी हेच एक ध्येय ठेवून वरोरा तालुक्यात महाराजस्व अभियान राबविले जात आहे.

.     सदर शिबिरात आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक कार्ड, संजय गांधी योजना अर्ज माहिती, उत्पन्न दाखले इत्यादी दाखले विषयक सेवा पुरविण्याचा संकल्प आहे. याकरिता महसूल विभाग व  संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहे. या महाराजस्व अभियानाचा भटके व विमुक्त जातीतील लाभार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन वरोरा तहसील कार्यालयातून केले जात आहे.