बापरे ! गायीने दिला दोन तोंड असलेल्या वासराला जन्म

234
  • गाय व वासरू ठणठणीत
  • पिल्लू पाहण्यासाठी गावागावातून नागरिकांची मोठी गर्दी

सुधीर पारधी

 भद्रावती : भद्रावती तालुक्यातील विलोडा गावात एका गायीने दोन तोंड असलेल्या वासराला जन्म दिला. विशेष म्हणजे वासराचे दोन्ही तोंड सारखे आहे. आणि  वासरु आणि गाय अगदी ठणठणीत आहे. एकाच वेळी दोन तोंड असलेल्या वासराचा जन्म होणं ही दुर्मिळ घटना असल्याचे बोलल्या जात आहे. दरम्यान आकर्षणाचे केंद्र बनलेल्या या चमत्कारी पिल्याचे दर्शन घेण्यासाठी गावागावातून व परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

.          भद्रावती तालुक्यातील विलोडा येथील शेतकरी संदिप घाटे  हे वडीलो पार्जित विलोडा गावात शेती करतात. व शेतीला जोड धंदा म्हणून त्यांनी सन 2016 मध्ये गाय खरेदी केली. त्यामाध्यमातून ते दूधाचा व्यवसाय आजही करत आहे.  या गायीची आतापर्यंत पाच वेळा प्रसूती झाली आहे. त्यात तिने पहिल्यांदा एकाच वेळी दोन तोंड असलेल्या वासराला जन्म दिल्याची घटना शनिवारी सकाळी 10 वाजता घडली. संदिप घाटे  हे गायीला व्यवस्थित खुराक चारा पाणी दिल्यानं गायीचे पोषण व्यवस्थित झाल्यानेच असे झाले असावे. ही गाय खऱ्या अर्थाने लक्ष्मी आहे. अशी प्रतिक्रिया शेतकरी संदिप घाटे यांनी दिली. विलोडा गावात दोन तोंडाच्या वासराचा जन्म झाला. हे माहीत होताच मोठ्या कुतूहलाने आजु बाजुच्या गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात वासराला पाहण्यासाठी गर्दी करताना दिसून येत होते.