बल्लारशाह स्थानकाच्या विकासकामांना गती मिळणार 

35

एनआरयूसीसी सदस्य अजय दुबे यांना डीआरएमचे आश्वासन

चंद्रपुर : अमृत भारत योजनेंतर्गत बल्लारशाह रेल्वे स्थानकाच्या विकासकामांना गती मिळणार आहे. एनआरयूसीसी सदस्य अजय दुबे आणि कामगार नेते पंकज परसराम यांनी आज नागपुरात नवनियुक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनीष अग्रवाल आणि डीसीएम अमन मित्तल यांची भेट घेतली आणि रेल्वेच्या समस्या आणि सूचनांवर चर्चा केली. स्थानिक समस्यांबाबत सविस्तर चर्चा करू, असे आश्वासन दिले. व स्वच्छतेचे निकष न पाळल्याबद्दल बल्लारशाह रेल्वे स्टेशन स्वच्छता बाबत लक्ष न देणार्‍या कंत्राटदारावर कडक कारवाई करण्यात येत आहे.

.       एनआरयूसीसी सदस्य अजय दुबे आणि कामगार नेते पंकज परसराम यांनी आज नागपुरात नवनियुक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनीष अग्रवाल आणि डीसीएम अमन मित्तल यांची भेट घेतली आणि रेल्वेच्या समस्या आणि सूचनांवर चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस बल्लारशाह ते मुंबई ते मुंबई धावण्याचा निर्णय घेण्यात आला असून रेल्वे बोर्डाकडून शुभारंभाची तारीखेची प्रतीक्षा आहे. तसेच काझीपेठ पुणे ट्रेन आठवड्यातून तीन दिवस बल्लारशाह स्टेशन वरून सुरू होण्याची शक्यता आहे.

.       डीआरएम अग्रवाल यांनी अमृत भारत योजनेंतर्गत बल्लारशाह रेल्वे स्थानकाच्या विकासकामांना गती देण्याचे निर्देश दिले, तसेच लवकरच बल्लारशाह येथे भेट देऊन स्थानिक समस्यांबाबत सविस्तर चर्चा करू, असे आश्वासन दिले. व स्वच्छतेचे निकष न पाळल्याबद्दल बल्लारशाह रेल्वे स्टेशन वर लापरवाही करणार्‍या कंत्राटदारावर कडक कारवाई करण्यात येणार  आहे.