संत रविदासांचे विचार सर्वांना प्रेरणादायी – संबा वाघमारे

38

बल्लारपुरात संत रविदास महाराज जयंती कार्यक्रम

समाज बांधवांचे करण्यात आले प्रबोधन

विसापूर : संत रविदास महाराज यांचे कार्य समाज सुधारणेचे होते. त्यांनी समाजाला विज्ञानवादाची शिकवण दिली. खऱ्या अर्थाने ते सामाजिक क्रांतीचे जनक ठरतात. त्यांनी समाजात अंधश्रदा व जातीव्यवस्थेवर प्रहार केला. आपल्या समाजाचा उद्धार त्यांचे विचार अंगिकारल्याने होणार आहे. यामुळेच संत रविदास महाराजांचे विचार सर्वांना प्रेरणादायी ठरणारे आहे,असे प्रतिपादन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विदर्भ अध्यक्ष संबा वाघमारे यांनी बल्लारपूर येथील संत रविदास महाराज जयंती कार्यक्रमात केले.

.        बल्लारपूर येथील संत रविदास महाराज समाज सेवा संस्थेच्या वतीने बल्लाळशाह नाट्य गृहात संत रविदास महाराज जयंती कार्यक्रम बुधवारी आयोजित करण्याय आला होता. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन संबा वाघमारे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मंचावर अनुलोमचे प्रमुख गजानन शिंदे,प्राचार्य अरुंधती कावडकर, भाजपचे युवा नेते आशिष देवतळे,चंद्रपूर जिल्हा राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष विप्लव लांडगे,हरीश गोरे,महिला आघाडीच्या अध्यक्ष शिला ढाक, संतोष तांडेकर, मोतीराम वादेकर, बल्लारपूर येथील समाजाचे अध्यक्ष रमेश टिकले, शंकर जोगे यांची उपस्थिती होती.

.        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना संबा वाघमारे म्हणाले,जात – जात मे जात है,ज्यो केलंन मे पात, रविदास न मानुष जुड सके,जौ लौ जात न जात ,असे सांगून समाजाने शिक्षणाची कास धरावी. आपल्या समाजात प्रबोधन केंद्र व्हावे.त्यातून विद्यार्थ्यासाठी स्पर्धा परीक्षा व्हावी,असे त्यांनी सांगितले. दरम्यान यावेळी सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन अजय खोब्रागडे यांनी केले.आभार रमेश टिकले यांनी मानले. यावेळी विलास जोगे,लोकेश गायकवाड,दिनेश भटवलकर,महादेव भेंडे आदीने यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.