ॲड.दीपक चटप आणि दिपक खेकारे समाजाकरिता आदर्श – डॉ. मंजुषा मत्ते

41

आदर्श हिंदी विद्या मंदिर गडचांदूर येथे सफलता की कहाणी आदर्श उपक्रम

गडचांदूर : शहरातील माणिकगड सिमेंट कंपनीच्या परिसरात असलेल्या आदर्श हिंदी विद्यामंदिर गडचांदूर येथे सफलता की कहाणी अंतर्गत कार्यक्रमत अॅड. दिपक चटप आणि पत्रकार व उपसरपंच दिपक खेकारे यांना आमंत्रित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानावरून अॅड. दिपक चटप आणि दिपक खेकारे समाजकरिता आदर्श आहे असे मत डॉ. मंजुषा मत्ते यांनी मांडले.

.       आदर्श हिंदी विद्या मंदिर गेल्या 2 वर्षांपासून एक आगळा वेगळा उपक्रम राबवत विद्यार्थाना प्रत्येक महिन्यात सफलता की कहाणी कार्यक्रमा अंतर्गत पाहुणे बोलवून त्यांची मुलाखत शाळेतील विद्यार्थांद्वारे घेत असतात  शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षणासोबत व्यक्तिमत्व विकास करण्याच्या हेतूने असे उपक्रम शाळा राबवित आहे. ब्रिटिश सरकार ची चेवनिंग स्कॉलरशिप पुरस्कृत ॲड.दीपक चटप यांनी मुलाखत सायना निषाद ह्या विद्यार्थिनीने घेतली यावेळी दिपक चटप यांनी देशातील शिक्षण व्यवस्था आणि इतर देशातील शिक्षणव्यवस्थेतील फरक सांगितला शिक्षण क्षेत्रांत विद्यार्थ्यांनी आपलं भविष्य कसे घडवावे या करिता मार्गदर्शन केले.

.       दिपक खेकारे यांची मुलाखत सचिन केवट  या विद्यार्थ्यांनी घेतली यावेळी  सामाजिक क्षेत्रात विद्यार्थानी आपला सहभाग नोंदवावा, एखाद्या लक्षाला भेदायच असल्यास स्वामीं विवेकानंदांनी सांगितलेल्या मार्गावर चालून लक्ष भेदावे,स्वतःमध्ये असलेल्या कलागुणांना शोधून ध्येय निश्चित करा आणि ध्येय प्राप्ती होई पर्यंत माघार घेऊ नका असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.

.       या कार्यकांचे कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.मंजुषा मत्ते मुख्यध्यपिक आदर्श हिंदी विद्या मंदिर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड.दीपक चटप, दीपक खेकारे शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती संचालन अनंत काळे, तर आभार प्रदर्शन पुरुषोत्तम बोरकर यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.