नागपूर- नागभीड रेल्वे मार्ग २०२४ मध्ये पुर्ण होण्याची शक्यता

44

नागभीड : नागपूर-नागभीड रेल्वे या जुन्या नॅरोगेज मार्गाचे ब्रॉडगेज रुंदीकरण काम चे 2020 पासून सुरू झाले होते आणि ते दोन वर्षात पूर्ण होणार असे अपेक्षित होते. मात्र ५ वर्ष होऊनही काम अर्धवटचं होते मात्र आता 7 फेब्रुवरी 2024 च्या त्यांच्या बैठकीत या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाली. आता २०२४ मध्ये काम पुर्ण होणाची शक्यता वर्तविली जात आहे.

.          देशाला उत्तर दक्षिण जोडणाऱ्या महत्वाच्या नागपूर बल्लारशाह मार्गाला नवा पर्याय आणि चंद्रपूर, उमरेड, खापरखेडा इथल्या कोळश्याला आणि आता नव्याने निघत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील लोह खनिजांच्या वाहतुकीसाठी नागपूर नागभीड रेल्वे मार्ग अतिशय महत्वाचा आहे.

.          नागपूर ते उमरेड हे काम नीट सुरू आहे पण मध्येच नागभीड ते उमरेड या सेक्शनला वनविभागाने त्यांच्या नियमानुसार लालफितशाही केली होती. मधल्या काळात बदललेले राज्य सरकार विदर्भाला फार अनुकूल नव्हते आणि त्यांनी वनविभागाच्या नियमाचे कारण पुढे करून काम जवळपास थांबवले होते. मुद्दा असा होता की हा मार्ग उमरेड कऱ्हाडला व ताडोबा जंगलाला जोडणाऱ्या कॉरिडॉर मधून जातो आणि वाघांच्या कॉलर चे GPS पाहिल्यावर लक्षात आले होते की नागभीड ते कम्पा, कम्पा ते भिवापूर आणि भिवापूर ते उमरेड या तीन खंडात वाघ हा रेल्वे मार्ग रोज रात्री क्रॉस करतात. त्यामळे वन्य प्रेमी आणि पत्रकारांनी आवाज उठवला होता,

.          महारेल्वेने या तीन खंडात वन्यप्राणी अंडर पास बांधायची तयारी दाखवली. त्यामुळे खर्च अर्थातच वाढणार होता. त्याला आधी राज्य वाइल्ड लाईफ बोर्डाने परवानगी दिली पण केंद्रीय वाइल्ड लाईफ बोर्डाने त्यासाठी दोन वर्षे उशीर केला. शेवटी 7 फेब्रुवरी 2024 च्या त्यांच्या बैठकीत या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाली, त्यानुसार नागभीड ते कम्पा, कम्पा ते भिवापूर आणि भिवापूर ते उमरेड या खंडात प्रत्येकी दोन वन्यप्राणी अंडर पास महारेल्वे बांधून देणार आहे,
सोबतच प्राणी जाण्यासाठी पुलांच्या बांधकामात काही बदल होणार आहेत, यामुळे उमरेड पर्यंत पुढच्या काही महिन्यात सुरू होणारी रेल्वे वाहतूक नागभीडपर्यंत पुढच्या वर्षात सुरु होण्याची शक्यता आता वाढली आहे.

नागपुर उमरेड मार्ग पुर्ण झाला असुन काही तांत्रिक चाचण्या सकारात्मक आल्यावर लवकरच त्यावर प्रवासी वाहतुक सुरु होऊ शकते. मात्र उमरेड नागभीड मार्गाचे काम वनविभागाच्या मंजुरीसाठी थांबले होते. आता या मंजुरीमुळे मात्र या कामाला गती मिळणार आहे.                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                                   संजय गजपुरे, झेडआरयुसीसी सदस्य, दपुम रेल्वे, बिलासपुर झोन