नंदोरीत १९ फेब्रुवारीला होणार भव्य शिवजयंती उत्सव

168

विविध स्पर्धेचे आयोजन

भद्रावती : श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान नंदोरीच्या वतीने १९ फेब्रुवारीला नंदोरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती होणार असून १७, १८ व १९ फेब्रुवारी या दरम्यान विविध स्पर्धेचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

.         शनिवार दि. १७ ला सायंकाळी ६ वाजता कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून चंदू वासाडे उपस्थित राहणार आहे तर अध्यक्षस्थानी ओ.बी.सी. नेते अशोक जिवतोडे तर प्रमुख पाहुणे पंचायत समिती भद्रावती चे माजी सभापती प्रविण ठेंगणे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., चंद्रपूर चे माजी अध्यक्ष तथा संचालक रविंद्र शिंदे, शेतकरी महासंघ, चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष नरेंद्र जिवतोडे, ग्राम पंचायत नंदोरी (बु) चे सरपंच मंगेश भोयर, ग्राम पंचायत नंदोरी (बु) च्या उपसरपंच उषा सुर्यभान लांबट, युवा प्रतिष्ठाण, नंदोरी (बु.) चे अध्यक्ष भानुदास ढवस उपस्थित राहणार आहे.

.         रविवार दि. १८ ला सायंकाळी ६ वाजता ह.भ.प. बालकिर्तनकार माऊली महाराज जाहूरकर यांचे भव्य किर्तन होणार असून त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर, भाजपा विधानसभा प्रमुख रमेश राजुरकर, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे, राष्ट्रवादी काँग्रेस चे विधानसभा अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती चे सदस्य विलास नेरकर, सामाजिक कार्यकर्ते कासिफ खान उपस्थित राहणार आहे.

सोमवार दि. १९ ला सायंकाळी ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य शोभायात्रेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे पंचायत समिती भद्रावती चे माजी सभापती प्रविण ठेंगणे, कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा चे सभापती विजय देवतळे, भा.ज.यु.मो. चे प्रदेश सचिव करण देवतळे, युवा प्रतिष्ठाण, नंदोरी (बु.) चे अध्यक्ष भानुदास ढवस, ग्राम पंचायत नंदोरी चे सरपंच मंगेश भोयर, ग्राम पंचायत नंदोरी च्या उपसरपंच उषा सु. लांबट, ग्राम पंचायत नंदोरी  चे माजी सरपंच शरद खामनकर, ग्राम पंचायत नंदोरी  चे सदस्य किशोर उमरे, अजित पुसनाके, कविता हंसकार, जयश्री एकरे, संगिता एकरे, शारदा जिवतोडे व  छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी व गावाकऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.

 १७ फेब्रुवारीला सकाळी 6 ते 7 स्वच्छता अभियान, दुपारी 12 ते 1 निबंध स्पर्धा, सायंकाळी 6 छत्रपती शिवाजी महाराज उद्घाटन सोहळा, रात्रो 8 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम,  18  फेब्रुवारीला सकाळी 6 ते 7 वाजता स्वच्छता अभियान, सकाळी 10 ते 12  वाजता वृक्षारोपण, सायंकाळी 5 ते 7 सेवा निवृत्त माजी सैनिकांचा सत्कार, रात्रो 8 वाजता  ह.भ.प. माऊली महाराज जाहूरकर यांचे भव्य किर्तन, १९ फेब्रुवारीला सकाळी 6 ते 7 स्वच्छता अभियान, दुपारी 12 ते 3 रांगोळी स्पर्धा,  दुपारी २ ते ५ वाजता भव्य रक्तदान शिबीर, सायंकाळी 5 ते 9 छत्रपती शिवाजी महाराज शोभायात्रा, रात्रो 9 ते 9.30 वाजता बक्षीस वितरण होणार आहे. या तीन दिवशीय स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान तथा समस्त ग्रामवासी नंदोरी च्या वतीने करण्यात आले आहे.