गोठयात घुसून बिबट्याने मारला 2 शेळ्यावर ताव 

39

बोथली येथील घटना

नेरी : घरालागत असलेल्या शेळ्यांच्या गोठ्यात वाघाने घुसून दोन शेळ्यांवर ताव मारल्याची घटना चिमुर तालुक्यातील बोथली येथे दि 8 फ़्रेब्रुवारी ला पहाटे 4 वाजताच्या दरम्यान घडली. सदर शेळ्या ह्या  विनोद परशराम नागपुरे यांच्या मालकीच्या असून त्यांचे अंदाचे 20 हजाराचे नुकसान झाले आहे.

.       बोथली येथील विनोद नागपुरे यांचे गोरवठ पांदण रस्त्याकडे घर असून घराला लागूनच बकऱ्यांचा व गाई म्हैसी चा गोठा आहे रात्रीच्या सुमारास जंगलात भ्रमंती करणारा बिबट्या हा घराला लागून असलेल्या शेतात दबा धरून बसला होता. पहाटेच्या सुमारास सर्व गाव शांत होताच बिबट्याने संधी साधून बकऱ्यांच्या गोट्यावर हमला केला आणि दोन्ही बकऱ्यांना जागेवर ठार करून एका बकरीला ओढत शेतात काही अंतरावर नेऊन ठेवले सकाळी गोठयात जाऊन पाहिल्यावर मालकाला सदर घटनेची माहिती मिळाली तात्काळ वनविभागाला झालेल्या घटनेची माहिती देण्यात आली तात्काळ वनविभागाचे काजळसर बिटाचे वनरक्षक पाटील साहेब आपल्या चमुसहित घटनास्थळी दाखल झाले.

.       मृत बकऱ्यांचे पंचनामा करून अहवाल वनविभागाला सादर केला बकऱ्यांच्या जाण्यामुले नागपुरे कुटुंबावर मोठे आघात झाले असून खूप मोठे नुकसान झाले आहे. सदर मालक भूमिहीन असून गरीब असल्याने प्राळीव प्राण्यांचे पालनपोषण करून तो आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत असतो तेव्हा तात्काळ सदर बकरी मालकाला वनविभागाने नुकसान भरपाई द्यावी तसेच गावात येणाऱ्या बिबट्याचे बंदोबस्त करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.