डॉ. राजपाल खोब्रागडे हे नागसेनवन बहुउद्देशीय स्मारक मंडळाकडून सन्मानित

43

सिंदेवाही :- मागील १५ वर्षापासून सामाजिक चळवळीत स्वतःला वाहून घेत तन मन धनाने सामाजिक कार्य करणारे कळमगाव (गन्ना) येथील रहिवासी डॉ. राजपाल खोब्रागडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत शिवनपायली येथील मिलिंद बुद्ध विहार, नागसेन वन धम्मभुमी बहुउद्देशीय स्मारक मंडळ यांचे वतीने नुकत्याच आयोजित केलेल्या बौद्ध धम्म समारंभात त्यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

.          डॉ.राजपाल खोब्रागडे हे भारतीय बौद्ध महासभा या धार्मिक संघटनेशी जुळून असून सद्या ते या संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. या माध्यमातून ते गावागावात, खेड्यापाड्यात, वस्ती तांड्यात, जावून धम्म चळवळीचे काम करीत आहेत. धम्माला अधिक गतिमान करण्यासाठी अनेक प्रकारचे शिबिर आयोजित करणे, गावागावात भारतीय बौद्ध महासभेच्या आणि समता सैनिक दलाच्या ग्राम शाखा तयार करणे, सामजिक सलोखा जोपासत महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी, आयोजित करून प्रबोधनात्मक कार्यक्रम घेणे. अशा प्रकारच्या इत्यादी सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे. त्यांच्या या धम्म कार्याची, आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना शिवनपायली येथील धम्म समारंभात त्यांना सन्मानित करण्यात आले असल्याने परिसरातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.