नागभीड येथे आज धम्म देसना कार्यक्रम

69

नागभीड : नागभीड नगरीत दक्षिण कोरियाचे भन्ते यांचे आगमन शुक्रवारी दिनांक 2 ला होत असून सकाळी 10.30 वाजता आनंद बौध्द विहार येथे भिक्कू संघांचे आगमन होणार आहे. सकाळी 11.30 वाजता रुक्मिणी सभागृह येथे स्वागत समारंभ व धम्म देसना कार्यक्रम होणार आहे.

.          या कार्यकर्माचे अध्यक्ष विनोद लांडगे राहणार आहेत. विशेष अतिथी धम्म मास्टर ली ची रॅन व्हाईस चान्सलर कोरीमन बुद्धिस्ट विद्यापीठ , धम्म मास्टर हाँग जीन सु दक्षिण कोरिया, मंगेश दहिवले सनदी अधिकारी अंतरराष्ट्रीय धम्म प्रचारक, नितीन साळवे लंडन बिझिनेस स्कूल धम्म प्रचारक हे उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख अतिथी म्हूणन शाम रामटेके, ऍड. आनंद घुटके, प्रा. ड्रॉ. अनमोल शेंडे, आर. डी. रामटेके, निकेश रामटेके असणार आहेत.
तरी या धम्म दिसनेला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे बौध्द समाज तालुका नागभीड यांनी आवाहन केले आहे.