प्रा.अपर्णा नैताम यांच्या गझलेची एल्गार गझल संमेलनासाठी निवड

34

नागभीड: खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र धुळे आयोजित पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन अमळनेर येथे अध्यक्ष शिवाजी जवरे, तसेच आयोजन समिती अध्यक्ष हेमलता पाटील, सचिव शरद धनगर यांच्या उत्कृष्ठ नियोजनातुन पार पडले. महाराष्टातील अनेक दिग्गज गझलकारांचा यात सामवेश होता.

.          अनेक उत्कृष्ठ गझला मधून नागभीड येथील गझलकार प्रा. अपर्णा नैताम (अपर्णा किशोर कोडापे) नागभीड यांच्या गझलेची निवड झाली. त्यांनी आतापर्यंत असंख्य साहित्य संमेलनातुन त्यांनी गझलाचे सादरीकरण केले असून. महाराष्ट्र साहित्य गौरव पुरस्कार नांदेड, तसेच मैत्रीकवीकट्टा पुरस्कार आणि सध्या मुल येथे पार पडलेल्या पहिले महिला राज्यस्तरिय झाडीबोली साहित्य संमेलन इथे त्याना झाडीबोली साहित्य मंडळ नागभीड चे अध्यक्ष जाहीर करण्यात आले. असंख्य संमेलनास त्याना निमंत्रित कवी गझलकार म्हणून सम्मानित करण्यात आले. या सगळ्यांचं यशाचे श्रेय त्या आईवडील आणि आपल्यां आप्त मित्र परिवारास दिले.