गोंदेडा तमुस ने लावून दिला प्रेमीयुगलांचा प्रेमविवाह

52

नेरी : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमीत तंटामुक्त समिती गोंदेडा च्या पुढाकाराने प्रेमीयुगलांचा प्रेम विवाह लावून देण्यात आला.

.         तंटामुक्त समिती गोंदेडा कडे प्रेमीयुगलांनी विवाह लावून देण्यासाठी विनंती अर्ज केला सदर प्रेमवीर मुलगा मिथुन चंद्रदीप शेरकुरे हा चिमूर तालुक्यातील गोरवठ या गावाचा असून मुलगी वैष्णवी हरीचंद्र धाडसे ही खांबाडा येथील रहिवासी आहे दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले मात्र यांच्या प्रेमाला घरातील मंडळी ही अडसर ठरत होती तेव्हा घरच्या लोकांच्या विरोधाला न जुमानता दोघानी लग्न करण्याचे ठरविले आणि सरळ गोंदेडा गाठून तमुस समितीकडे विवाह करून देण्यासाठी विनंती अर्ज सादर केले तेव्हा समितीने दोघांचेही कागदपत्रे आणि वयाचे दाखले तपासून तपोभूमीवर विवाह लावून दिला.

.         यावेळी तमुस अध्यक्ष गोंदेडा पोलीस पाटील गोंदेडा अक्षय दिवाकर शेंडे, रत्नमाला सोनुने सदस्य तमुस सचिन तडस जाम, रविंद्र चौधरी खांबाडा अंकुश मेश्राम तमुस अध्यक्ष खांबाडा संजय गायकवाड पो पाटील खांबाडा उपस्थित होते. याशिवाय गावातील नागरिक महिला पुरुष विवाह सोहळ्यात उपस्थित होते.